IAS-IPS Officer | IAS-IPS अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर White टॉवेल का असतो? समाज माध्यमांवर सुरूय मनोरंजक चर्चा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – IAS-IPS Officer | Indian Administrative Service (IAS) आणि Indian Police Service (IPS) यांच्या ऑफिसमध्ये त्या अधिका-यांच्या खुर्चीवर पांढरा टॉवेल (White Towel) का असतो ? या मुद्द्यावरून समाज माध्यमांवर अधिक चर्चा रंगताना दिसत आहे. दरम्यान याची सुरूवात आईआरटीएस (IRTS) अधिका-याने केलेल्या ट्वीटपासून झाली आहे. तर मग जाणून घ्या नेमकं आईआरटीएस अधिकारी म्हणाले काय. (IAS-IPS Officer)

 

जर एका खोलीत 10 एकसारख्या खुर्च्या असतील तर सीनिअरची खुर्ची कशी ओळखाल ? त्यावर पांढरा टॉवेल ठेवा. या ट्वीटनंतर युजर्स कमेंट्स करीत प्रतिक्रिया देत आहेत काही अधिकाऱ्यांनी ही या पोस्टवर प्रतिक्रिया दिलीय. त्याचं झालं असं की, आईआरटीएस अधिकारी संजय कुमार (Sanjay Kumar IRTS) यांनी प्रशासकाबाबत ट्वीट करीत खुर्चीवर पांढरा टॉवेल ठेवल्याचा उल्लेख केला आहे. एकदा माझ्या वरिष्ठांनी मला विचारलं की, टॉवेल नाहीये ? मी म्हणालो, ”सर खुर्ची स्वच्छ आहे.” असं संजय कूमार यांनी यावेळी त्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अशी झाली खुर्चीवर पांढरा टॉवेल ठेवण्याची सुरूवात –
आईएएस आणि आईपीएस अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर पांढरा टॉवेल (White Towel) ठेवण्याची सुरुवात कशी झाली. याबाबत आईआरएस (IRS) अधिकारी विकास प्रकाश सिंह (Vikas Prakash Singh) यांनीही आपलं मत मांडलं आहे. याची सुरुवात शक्यतो, ब्रिटीश काळात जाड कुशन असलेल्या खुर्ची असताना झाली असावी. त्यावेळी एसी वगैरे नव्हता. घामामुळे खुर्ची ओली होत होती. त्यामुळे त्यावर टॉवेल ठेवला जात होता. मात्र कालांतराने हा स्टेटस सिंम्बल झाला. जो आजही सुरू आहे. असं ते म्हणाले. (IAS-IPS Officer)

दरम्यान, काय म्हणाले लोक ? आईआरटीएस अधिकारी संजय कुमार यांच्या ट्वीटवर IAS सोमेश उपाध्याय (Somesh Upadhyay) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ..सेंटरमध्ये असणारी खुर्ची देखील..म्हणजे कोणत्याही कार्यक्रमात मध्ये असलेल्या खुर्चीवर बसणं स्टेटस सिंम्बल झाले आहे. असं त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहिलं आहे.

 

Web Title :- IAS-IPS Officers | why white towels on chairs ias and ips officers sparked debate bureaucracy social media IRTS IRS

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा