IAS-IPS | अवघ्या 75 कुटुंबाच्या ‘या’ गावात प्रत्येक घरात एक IAS किंवा IPS अधिकारी, जाणून घ्या विशेष गावाबद्दल

लखनऊ : पोलीसनामा ऑनलाइन  –  IAS-IPS | उत्तर प्रदेशमध्ये एक असे गाव आहे जिथे जन्मलेले बहुतांश लोक आयएएस अधिकारी होतात. ज्यामुळे या गावाला अधिकार्‍यांचा गाव म्हटले जाते. या गावातील प्रत्येक घरात एक अधिकारी आहे. हे गाव जौनपुर जिल्ह्यात असून त्याचे नाव माधोपट्टी आहे. (IAS-IPS ) या गावात 75 घरे आहेत. आतापर्यंत उत्तर प्रदेशसह जवळपासच्या राज्यांमध्ये कार्यरत 47 आयएएस अधिकारी या गावातील आहेत.

1914 मध्ये या गावातील मुस्तफा हुसैन यांची आयएएस अधिकारी म्हणून निवड झाली होती. पीसीएसमध्ये निवड झाल्यानंतर ब्रिटिश सरकारला आपली सेवा दिली.
याच काळात इंदु प्रकाश सिंह नावाच्या व्यक्तीची सुद्धा आयएएस अधिकारी म्हणून निवड झाली होती.
ते 13व्या स्थानावर होते आणि फ्रान्ससह अनेक देशांत राजदूत म्हणून त्यांनी काम केले होते. (IAS-IPS )

इंदु प्रकाश सिंह यांच्या निवडीनंतर या गावातील आयएएस अधिकारी तयार होऊ लागेल. या गावातील विनय सिंह बिहारचे सचिव सुद्धा झाले होते.
ते 1955 मध्ये परीक्षा पास झाले होते. 1965 मध्ये त्यांचे दोन्ही भाऊ सुद्धा आएएस परीक्षा पास झाले.

महिला सुद्धा आहेत पुढे :

या गावातील महिला सुद्धा पुढे आहेत. गावातील उषा सिंह आयएएस अधिकारी झाल्या. 1983 मध्ये चंद्रमौल सिंह आणि 1983 मध्ये त्यांची पत्नी इंदु सिंह आयपीएस अधिकारी झाले.
या गावातील अमित पांडे अवघ्या 22 वर्षांचे आहेत आणि त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. गावातील अनमजय सिंह वर्ल्ड बँक मनीलामध्ये आहेत.
ज्ञानु मिश्रा राष्ट्रीय अंतराळ संस्था म्हणजे इस्त्रोमध्ये काम करत आहेत.

 

Web Title : IAS-IPS | One IAS or IPS officer in every household in this village of just 75 families, learn about the special village

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | पुण्यातील ‘आरे’ वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमी संस्थांचे आदित्य ठाकरे यांना साकडे

Satara Black Magic Case | ‘ती’ मुलगी बालसुधारगृहात ! स्मशानात अघोरी पूजा करणाऱ्या 6 जणांना पुण्यातून अटक

Bank Holidays In Maharashtra | ऑक्टोबरमध्ये 10 दिवस बंद राहणार बँका; खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची लिस्ट