यशोगाथा : ‘हे’ तिघे शाळेत नापास झाले तर कॉलेज सोडून दिलं, मेहनतीनं बनले IAS आणि IPS अधिकारी

पोलीसनामा ऑनलाईन टीम – यूपीएससी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा ही जगभरातील दोन नंबरची सर्वात अवघड परीक्षा मानली जाते. या परीक्षेसाठी दरवर्षी जवळपास १० लाख अर्ज केले जातात. त्यापैकी फक्त १ हजारांची निवड होते. इतक्या जास्त स्पर्धेमुळे केवळ हुशार आणि चांगली पार्श्वभूमी असणारी मुलेच ही परीक्षा पास होतात असा समाज आहे. मात्र या परीक्षेसाठी हुशारीपेक्षा मेहनतीला अधिक महत्त्व असून यासाठी जर पूर्ण समर्पण आणि प्रामाणिकपणाने वेळ दिला तर ते विद्यार्थीच यशस्वी होतात. आजच्या यशोगाथामध्ये आम्ही तुम्हाला काही IAS-IPS अधिकाऱ्यांची ओळख करून देणार आहोत. हे अधिकारी आहेत ज्यांपैकी काही शाळेत अयशस्वी झाले, काहींनी महाविद्यालयातून शिक्षण सोडले परंतु नंतर त्यांनी त्यांच्या अपयशापासून बोध घेऊन मेहनतीने प्रगती केली आणि आपले ध्येय्य साध्य केले.

image.png

१) रुक्मणी रियार (Rukmani Riar) : राजस्थान केडरची  २०१२ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी यूपीएससी सीएसई – २०११ ची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात ऑल इंडिया सेकंड रँक मिळविला. रुक्मणी शाळेत असताना इतकी हुशार नव्हती. इयत्ता सहावीत तर ती नापास झाली होती. पण यानंतर तिने कठोर परिश्रम करण्याचे ठरवले. तिचे यश पाहून असे वाटते की चिकाटीने प्रयत्न केल्यास काहीच अशक्य नाही. रुक्मणी सध्या राजस्थानातील बुंडी येथे जिल्हा न्यायदंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

image.png

२) उमेश गणपत खंडबहाल (Umesh Ganpat Khandbahal) : उमेश हे २०१५ बॅचचे पश्चिम बंगाल केडरचे IPS अधिकारी आहेत. HSC (Higher Secondary school Certificate) अर्थात १२ वी मध्ये नापास झाले होते.  १२ वी इयत्तेचे अपयश विसरून त्यांनी परिश्रमपूर्वक अभ्यास केला आणि पदव्युत्तर पदवी मिळवली. आपल्या तिसर्‍या प्रयत्नात उमेश AIR-७०४ सह CSE २०१४ ची परीक्षा पास होऊन IPS झाले.

image.png

३) के इलामबावथ  (K Elambahavath) :  हे तामिळनाडू केडरचे २०१६ च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना आर्थिक अडचणीमुळे १२ वी मध्ये शाळा सोडावी लागली होती. त्यानंतर अनेक आव्हाने व अडचणी असूनही त्यांनी १९ वर्षांनंतर आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यांनी AIR -११७ मिळवून CSE -२०१५ च्या परीक्षेत IAS चे पद मिळवले.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या

 

You might also like