Coronavirus Lockdown : राज्यातील ‘कोरोना:च्या ‘वॉर रुम’ची जबाबदारी आश्विनी भिडे यांच्याकडे

पोलिसनामा ऑनलाईन टीम – आपत्कालीन व्यवस्थापन कक्षामध्ये ’कोरोना वॉर रुम सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिकेत प्रतिनियुक्तीवर नुकत्याच रुजू झालेल्या अश्विनी भिडे यांच्याकडे ’वॉर रुमची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ’वॉर रुमच्या माध्यमातून आवश्यक ती नियोजनात्मक, प्रतिबंधात्मक व व्यवस्थापकीय कार्यवाही दिवसाचे चोवीस तास आणि आठवड्याचे सातही दिवस सातत्याने करण्यात येणार आहे.

वॉर रुमच्या माध्यमातून कोरोनाविषयक सांख्यिकीय माहिती एकत्र करून त्या माहितीचे विश्लेषण करण्यात येणार आहे. या माहितीच्या आणि विश्लेषणाच्या आधारे प्रतिबंधात्मक कार्यवाहीची व नियोजनाची पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे. यानुसार विभागस्तरीय नियोजन व प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही देखील सातत्याने करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील कोविड करोना 19’च्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील दोन अधिकार्‍यांना प्रतिनियुक्तीवर महानगरपालिकेत पाठविले आहे. यामध्ये 1995 च्या तुकडीतील श्रीमती अश्विनी भिडे आणि 2004 च्या तुकडीतील डॉक्टर रामस्वामी एन. या दोन अधिकार्‍यांचा समावेश आहे.

आरे वसाहतीमधील मेट्रो-3 च्या कारशेडच्या मुद्द्यावरुन अश्विनी भिडे आणि शिवसेनेमध्ये तीव्र मतभेद झाले होते. आरे वसाहतीमध्ये मेट्रो-3 चे कारशेड उभारले जाणार आहे. परंतु पर्यावरणवादी आणि तिथल्या स्थानिकांनी त्यास विरोध केला होता. याचदरम्यान शिवसेना स्थानिकांच्या आणि पर्यावरणवाद्यांच्या बाजूने उभी राहिली. तर अश्विनी भिडे कारशेड आरे वसाहतीमध्ये बांधण्यावर ठाम होत्या. त्यावेळी शिवसेना आणि भिंडे यांच्यात खटका उडाला होता. मात्र, हे मतभेद बाजूला ठेवत ठाकरे सरकारकडून अश्विनी भिडे यांची प्रधान सचिवपदी बढती देण्यात आली होती. त्यानंतर आता अश्विनी भिडे यांच्याकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.

You might also like