मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेंचा ‘दणका’, पुष्पगुच्छ देणाऱ्या अधिकाऱ्याला 5 हजाराचा ‘दंड’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – कर्तव्यदक्ष जिल्हाधीकारी म्हणून ओळख असलेले आस्तिक कुमार पांडे यांनी औरंगाबाद महापालिकेत आयुक्त पदाचा पदभार स्विकारताच आपल्या कामकाजाला सुरुवात केली. पांडे यांना स्वागताचा पुष्पगुच्छ देणाऱ्या अधिकाऱ्यालाच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. कारण प्लास्टिक बंदी असताना, स्लास्टिक लावून पुष्पगुच्छ आणल्यामुळे अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई पांडे यांनी केली. त्यामुळे त्यांच्या कामाचे कौतुक होत असतानाच अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाईमुळे पालिकेत खळबळ उडाली आहे.

आस्तिक कुमार पांडे यांनी आज औरंगाबाद महापालिका आयुक्त पदाचा पदभार घेतला. ते या आधी बीड येथे जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते. या ठिकाणी प्रशासनात अत्यंत कडक आणि शिस्तप्रिय असा त्यांचा नावलौकिक होता. हाच दरारा औरंगाबाद येथे पहिल्याच दिवशी पहायला मिळाला. आयुक्तांनी पदभार स्विकारल्यानंतर नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक आर.एस. महाजन यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मात्र, पुष्पगुच्छ बनविण्यासाठी प्लास्टिकचा वापर करण्यात आल्याचे लक्षात येताच आयुक्तांनी महाजन यांना तात्काळ 5 हजार रुपयांचा दंड आकारला. बीड येथे देखील अशाच प्रकारे एका शासकीय कार्यक्रमात प्लास्टिकचे ग्लास वापरल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी जिल्हा प्रशासनास दंड आकारला होता.

स्वत:लाही दंड आकारला
यापूर्वी आस्तिक कुमार पांडे यांनी स्वत:वरच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना चहा पिण्यासाठी प्लास्टिक कपचा वापर केल्याने स्वत:ला दंड ठोठावला. बीडमध्ये निवडणुकीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये हा प्रसंग घडला होता. पत्रकारांनी हा प्रकार समोर आणल्यानंतर त्यांनी सर्वांसमोर स्वत:ला दंड ठोठावला होता.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like