कौतुकास्पद ! कोचिंग क्लास शिवाय बनली IAS अधिकारी, ‘या’ अडचणींचा केला ‘सामना’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्वप्न तर सगळेच जण पाहतात परंतु काही जणांचेच स्वप्न सत्यात उतरते. अशीच एक कथा आहे एका महिला आयएएस अधिकारीची. त्या आहेत सौम्या शर्मा.

सौम्या यांनी संघ लोकसेवा आयोगाची परिक्षा पहिल्यांदा 2017 साली दिली होती. तेव्हा त्या 22 वर्षांच्या होत्या. त्या म्हणाल्या की त्यांनी योग्य पद्धतीने यूपीएससी परिक्षेची तयारी 19 फेब्रुवारी 2017 साली सुरु केली होती. म्हणजे यूपीएससी परिक्षेच्या 4 महिन्याआधी. तेव्हा त्या एनएलयूमध्ये लॉच्या अंतिम वर्षाला होत्या. त्यांनी त्यांच्या ऑपश्नल सबजेक्ट देखील कायदा हाच ठेवला होता. सौम्या म्हणाल्या की मी यूपीएससीच्या परिक्षेच्या तयारीसाठी कोचिंग क्लास ज्वाइंन केला नव्हता. परंतु मी अनेक टेस्ट सीरिज दिल्या होत्या. यामुळे मला बरेच सहाय्य झाले.

त्यांनी पूर्व परिक्षा पास केली, परंतु मुख्य परिक्षेच्या एक आठवड्यापूर्वी त्यांना ताप आला होता. सौम्या म्हणाल्या, आठवडाभर मला ताप होता. परिक्षेच्या दिवशी देखील शरीराचे तापमान 102 डिग्री पेक्षा कमी होत नव्हते. कधी कधी तापमान 103 डिग्री जात होते. मला दिवसाला तीनदा सलाइन चढवण्यात येत होती. एवढेच नाही तर परिक्षेच्या दरम्यान ब्रेकमध्ये देखील मला सलाइन लावण्यात येत होती.

सौम्या म्हणाल्या की मला आठवत आहे की जीएस – 2 च्या परिक्षेदरम्यान मला डोळ्यांसमोर आंधारी येत होती. मी त्यानंतर तात्काळ ऊर्जा मिळावी म्हणून चॉकलेट खात होते आणि उत्तर पत्रिका लिहित होते.

सौम्याची ऐकू येण्याची क्षमता कमी आहे. ती हियरिंग अॅडशिवाय ऐकू शकत नाही. परंतु सौम्याने याचा फायदा यूपीएससीच्या परिक्षेत घेतला नाही. तिने सामान्य श्रेणीत अर्ज केला होता. पहिल्याच परिक्षेत सौम्याला यश मिळाले. यूपीएससी 2017 च्या परिक्षेत सौम्याने देशभरात 9 वी रॅंक मिळवली होती.