Coronavirus : परदेशात हनिमूनसाठी गेलेला IAS अधिकारी ‘क्वारंटाईन’मधून पळाला, नियमांचे उल्लंघन केल्याने निलंबित

कोची : वृत्तसंस्था –  सिंगापूर आणि मलेशिया येथून हनिमूनहुन वरून केरळ येथे आलेल्या आयएएस अधिकाऱ्याने होम क्वारंटाईन असताना घरातून पळ काढला. या आयएएस अधिकाऱ्याने नियम तोडून घरी पलायन केल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत निलंबित करण्यात आले आहे. देशातील कोरोना व्हारसच्या संकटामुळे त्याला होम कॉरंटाईन राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्याने नियमांचे उल्लंघन करत तिथून पळ काढला, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोल्लमचे उप जिल्हाधिकारी अनुपम मिश्रा असं पलायन केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

कोल्लमचे उप जिल्हाधिकारी असलेले अनुपम मिश्रा हे मुळचे उत्तर प्रदेशाचे आहेत. आरोग्य विभागाच्या अहवालाच्या आधारे कोल्लमचे पोलीस अधीक्षक टी नारायण यांनी ही माहिती दिली आहेत. मिश्रा हे हनिमुनसाठी परदेशात गेले होते. ते 19 मार्चला केरळला परत आले. त्यावेळी त्यांना प्रोटोकोलप्रमाणे निरिक्षणाखाली ठेवण्यात आले होते. त्यांच्या सोबत असलेल्या अंगरक्षकाला देखील निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळून आली नसल्याने त्यांना होम क्वॉरंटाईन राहण्यास सांगितले होते.

मिश्रा यांनी कोणालाही न सांगता बंगळुरू सोडले. ज्यावेळी त्यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी मी बंगळुरूध्येच असल्यची खोटी माहिती दिली. मात्र, त्याने कुटुंबाससोबत बंगळुरू सोडल्याची माहिती नासेर यांनी दिली. दरम्यान, पोलिसांनी मिश्रा यांचे मोबाईल टॉवरचे लोकेश तपासले असता त्यांच्या मोबाईलचे टॉवर उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये असल्याचे समजले.
अशी झाली पोल खोल

आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून दररोज केल्या जाणाऱ्या पाहणीत अनुपम मिश्रा घरात नसल्याचे आढळून आलं अशी माहिती जिल्हाधिकारी अब्दुल यांनी दिली. तपास केला असता अनुपम मिश्रा उत्तर प्रदेशात पोहचल्याची माहिती समोर आली. याबाबत पोलिसांना कळवण्यात आले. दरम्यान, केरळमधील अधिकारी उत्तर प्रदेशातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. सरकारने लॉकडाऊन जाहीर केला असतानाही त्यांनी राज्याबाहेर प्रवास कसा केला याची चौकशी केली जात आहे.