जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:लाच केला हा ‘दंड’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात सिंगल युज प्लॅस्टिकवर बंदी आहे, असे असताना आपल्या कार्यालयात प्लॉस्टिकचा वापर होत असल्याचे पाहून बीडचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी प्लॅस्टिक कपचा वापर केल्याबद्दल आपल्या कर्मचाऱ्यांसह स्वत:वर ५ हजार रुपये दंडाची कारवाई केली.

याबाबतची माहिती अशी, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेत पत्रकारांना प्लॉस्टिकच्या कपातून चहा देण्यात आला. या दरम्यान, एका पत्रकाराने प्लॅस्टिकवर बंदी असल्याचे जिल्हाधिकारी पांडे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर तेथून प्लॅस्टिक कप हटविण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी स्वत:वर दंडाची कारवाई करताना प्लॅस्टिक बंदी पूर्णपणे लागू करण्यात यशस्वी ठरलो नसल्याचे मान्य केले.

विशेष म्हणजे महाराष्ट्रात सिंगल युज प्लॅस्टिकच्या उत्पादनांवर पूर्णपणे बंदी असताना राजरोजपणे या प्लॅस्टिकचा वापर होत आहे. राज्य निवडणुक आयोगानेही निवडणुक प्रक्रियेच्या काळात सिंगल युज प्लॅस्टिक उत्पादनांच्या वापराबाबत जागृती करण्यावर भर देण्यास सांगितले असून निवडणुकीत प्लॅस्टिकवर बंदी घालती आहे.

Visit : Policenama.com