संरक्षण मंत्री राजनाथन सिंह याचे पर्सनल सेक्रेटरी म्हणून या IAS अधिकाऱ्याची नियुक्ती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर मोदी सरकारमधील मंत्र्यांच्या नियुक्तीनंतर आता त्यांच्या पर्सनल सेक्रेटरींची नियुक्ती करण्यास सरकारने सुरुवात केली आहे. याची सुरुवात झाली असून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांच्यासाठी पर्सनल सेक्रेटरींची निवड करण्यात आली आहे.

याबरोबरच क्रिडा मंत्री किरेन रिजिजु आणि गिरिराज सिंह यांच्यासाठी देखील पर्सनल सेक्रेटरी नेमण्यात आले आहेत.

आयएएस आधिकारी कुंदन कुमार यांची गुरुवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पर्सनल सेक्रेटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 2004 च्या बॅचचे असलेले हे कर्मचारी कुंदन कुमार हे बिहार कॅडरचे अधिकारी असून त्यांचा कार्यकाळ तीन फेब्रुवारी 2020 असणार आहे.

तर मोहन कोठारी यांची कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांचे पर्सनल सेक्रेटरी म्हणूण नियुक्ती करण्यात आली आहे. कोठारी 2001 च्या बॅचचे मध्यप्रदेश कॅडरचे आयएएस आधिकारी आहेत.

तर आयएएस आधिकारी सचिन शिंदे यांची क्रिडा मंत्री किरेन रिजिजू यांचे पर्सनल सेक्रेटरी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. रिजिजू अल्पसंख्याक प्रकरणासाठी नेमणूक केलेले राज्य मंत्री देखील आहे. बिहार कॅडरचे 2009 च्या बॅचचे आधिकारी मनोज कुमार सिंह यांची ऊर्जा मंत्री राजकुमार सिंह यांचे पर्सनल सेक्रेटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आयआरएस आधिकारी राज कुमार दिग्विजय यांची पशुपालन आणि मत्स्य पालनमंत्री गिरिराज सिंह यांचे पर्सनल सेक्रेटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सिने जगत – 

सिंगर नेहा भसीनने शेअर केले तिचे ‘हॉट’ फोटो अन् पहाता-पहाता सोशलवर धुमाकूळ

हे काय, अरबाज आणि मलायका पुन्हा ‘एकत्र’ ?

ती माझ्या पती’सोबत’ होती, तिला मुलगी कशी म्हणू ; आदित्य पांचोलीच्या पत्नीचा कंगनावर ‘निशाणा’

..म्हणून अभिनेत्री ईशा गुप्‍ता भडकली ‘आधार कार्ड’च्या प्राधिकरणावर