‘ते’ फोटो हटवल्यामुळं ‘या’ महिला IAS अधिकारी सध्या ‘चर्चेत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही आठवड्यांतील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर म्हैसकर हे हाय प्रोफाइल आयएएस-ऑफिसर जोडपे फेसबुक पोस्टमुळे चर्चेत आले आहे. नगरविकास विभागातील प्रधान सचिव मनीषा पाटणकर म्हैसकर यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दुसर्‍या वेळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालयात फडणवीस यांचे स्वागत करतानाचा एक फोटो पोस्ट केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने नवीन सरकारला 24 तासांच्या आत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर 72 तासांतच फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर काही तासांनंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे पुढचे मुख्यमंत्री असतील हे स्पष्ट झाल्यावर मनीषा म्हैसकर यांनी फडणवीस यांच्यासह असलेला फोटो डिलिट करून उद्धव ठाकरे यांच्यासह फेसबुक फोटो ठेवला. हा फोटो कांदिवली येथील नागरी संस्थेच्या शताब्दी रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी 2013 ला घेण्यात आलेला आहे. तेव्हा म्हैसकर ह्या महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त होत्या. म्हैसकर यांनी पोस्ट हटवल्या, मात्र एक इंग्रजी वृत्तपत्र या पोस्टचा स्क्रीनशॉट घेण्यात यशस्वी ठरले.

मनीषा म्हैसकर ह्या 1992 च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालक, वैद्यकीय शिक्षण सचिव आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अशी पदे भूषविली आहेत. मनीषा म्हैसकर या नागपूरच्या असून त्या सरस्वती विद्यालयात आणि नंतर लॉ कॉलेजमध्ये देवेंद्र फडणवीस यांना एक वर्षाने सिनिअर होत्या. तर त्यांचे पती मिलिंद म्हैसकर हे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) चे सीईओ आणि उपाध्यक्ष आहेत.

Visit : policenama.com