Pune : IAS अधिकारी सुधाकर शिंदे यांचा कोरोनामुळे अवघ्या 34 वर्षी मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना महामारीमुळे विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांची संख्याही मोठी आहे. पुण्यातही अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. येथील त्रिपुरा कॅडरचे आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ते 34 वर्षांचे होते.

सुधाकर शिंदे हे 2015 च्या बॅचचे ते अधिकारी होते. त्रिपुरात त्यांची नियुक्ती होती. शिंदे मुळचे परभणीचे असून सुट्टीसाठी गावी आले असताना त्यांना कोरोनाची लागण झाली. यानंतर उपचारासाठी त्यांना पुण्यातील रूबी क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांची कोरोनाविरूद्धची ही झुंज अखेर अपयशी ठरली.

राज्याभरात कोरोना जोर अजूनही कमी झाला नसल्याचे आकडेवारी दिसून येत आहे. काही जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा आलेख चढता असल्याचे दिसून आले आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने शुक्रवारी 15 लाखांचा टप्पा पार केला होता. राज्यातल्या रुग्णांची एकूण संख्या 15,06,018 एवढी झाली असून सध्या 2,36,491 रुग्णांवर विविध रूग्णालयांमधून उपचार सुरू आहेत. तर 302 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत झालेल्या एकुण मृत्यूची संख्या 39,732 एवढी झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात 12 हजार 134 नवे रूग्ण सापडले आहेत.