IAS Pooja Singhal Suspended | वरिष्ठ आयएएस अधिकारी पूजा सिंघल निलंबित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – IAS Pooja Singhal Suspended | मनरेगा आणि मनी लाँड्रिंगमध्ये (MNREGA And Money Laundering Cases) अडकलेल्या झारखंडच्या वरिष्ठ आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. प्रदीर्घ चौकशीनंतर बुधवारी रात्री सक्तवसुली संचालनालयाने (ED) पूजा सिंघलला अटक (Arrested) केली होती. अटकेनंतर हेमंत सोरेन सरकारने (Hemant Soren Government) निलंबनाची कारवाई केली आहे. बुधवारीच मुख्यमंत्री सोरेन यांनी कायदेशीर कारवाईचे वक्तव्य केले होते. नंतर पूजा सिंघल यांच्या निलंबनाची अधिसूचना जारी केली आहे.

 

ईडीकडून पूजा सिंघलच्या (IAS Pooja Singhal Suspended) सीए सुमन कुमार (CA Suman Kumar) यांच्या घरातून 17.49 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. तसेच हा पैसा पूजा सिंघलचा असल्याचं सुमन कुमार यांनी सांगितलं होतं. अधिकारी पूजा सिंघल यांच्या सीए सुमन कुमार यांनी जप्त करण्यात आलेल्याय रोख रकमेचा उलगडा झाला आहे. सुमन कुमार यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या घरातून जप्त केलेले 17.49 कोटी रुपये पूजा सिंघलचे आहेत. नुकतेच सुमनने पूजाच्या पतीला ३ कोटी रुपये रोख दिले होते. तसेच, पूजा सिंघलने लाच घेतल्याचेही समोर आले असल्याचं मीडिया रिपोर्टनुसार समजते.

 

दरम्यान, पूजा सिंघल यांची मनी लाँड्रिंग प्रकरणात ED 5 दिवस चौकशी करणार आहे. न्यायालयाने ईडीला चौकशीसाठी रिमांड घेण्याची परवानगी दिली आहे. ईडीने चौकशीसाठी बारा दिवसांची परवानगी मागितली होती, मात्र, फक्त पाच दिवसांची परवानगी देण्यात आली आहे. 5 दिवसांच्या चौकशीनंतर पूजा सिंघलला 16 मे रोजी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

 

Web Title :- IAS Pooja Singhal Suspended | ias officer pooja singhal suspended ca reveals money secrets

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा