IAS संजीव जयस्वाल यांचा लेटर बॉम्ब, केला ‘गोल्डन गँग’ बाबत गौप्यस्फोट !

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – आयपीएस अधिकाऱ्यांच्या लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाल्यानंतर आता आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या लेटर बॉम्बची चर्चा आहे. ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त संजीव जयस्वाल (IAS Sanjeev Jaiswal) यांनी मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांना पत्र लिहून ठाण्यातील काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय घाडीगावकर यांच्यावर गंभीर आरोप करत तक्रार केली आहे.

कोरोनातून बरे झाल्यावर ‘या’ गोष्टींचं चुकूनही करू नका सेवन, अन्यथा…

संजय घाडीगांवकर ‘गोल्डन गँग’ चालवतो

संजीव जयस्वाल यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, संजय घाडीगावकर हे एक खंडणीखोर, ब्लॅकमेलर, गुंड असल्याचा आरोप केला आहे.
पाणी असणार्‍या ‘या’ 5 फळांचं नक्की सेवन करा, डिहायड्रेशनपासून वाचेल शरीर; जाणून घ्या
जयस्वाल यांनी आरोप केला बिल्डर सुरज परमार केसमध्ये अटक करण्यात आलेले चार आरोपी एनसीपी (NCP) नगरसेवक नजीब मुल्ला,
हनमंत जगदाळे, काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण आणि मनसेचे माजी नेते सुधाकर चव्हाण सोबत संजय घाडीगांवकर ‘गोल्डन गँग’ (Golden Gang) चालवतो.
जे ठाण्यात खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि अनधिकृत काम करुन पैसे कमवतात.

Maratha Reservation | ‘…तर मराठा आरक्षणासाठी जो कोणी पुढे येईल त्याला भाजपाचा पाठिंबा राहील’ – चंद्रकांत पाटील

म्हणून आपल्याविरुद्ध खोटी तक्रार केली

जयस्वाल यांचा आरोप आहे की ठाण्यात ही टोळी खूप सक्रिय आहे.
त्यांच्या विरुद्ध त्यांनी टीएमसी कमिश्नर असताना कारवाई केली होती.

दिवसाला 5 बदाम वाढवतील तुमची ‘इम्यून’ पावर, पाण्यात भिजवून खावे, जाणून घ्या
त्यांच्यामुळे संजय घाडीगांवकर याचं नगरसेवक पद रद्द झालं आणि त्याचा राग म्हणून आपल्याविरोधात खोटी तक्रार केली जात आहे, असं जयस्वाल यांनी पत्रात म्हटले आहे.
जयस्वाल यांनी पत्रात ठाण्यातील विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांना जयस्वाल यांनी एक पाच पानाचं पत्र लिहिलं आहे.

घाडीगावकरांकडून मानसिक त्रास

संजीव जयस्वाल यांनी या पत्रात त्यांनी आपण ठाण्याचे आयुक्त असताना घाडीगावकर आपल्याला मानसिक त्रास देत होते.
मला धमक्या देखील देत होते, असं त्यांनी म्हटलं आहे.
संजय घाडीगावकर यांच्या विरोधात सविस्तर क्रिमिनल चौकशी करावी, अशी मागणी देखील जयस्वाल यांनी पत्रातून केली आहे.

वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात आवश्य प्या हे 3 डिटॉक्स ड्रिंक्स, जाणून घ्या बनवण्याची पध्दत

संजय घाडीगावकर यांचे आरोप

माजी नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी संजीव जयस्वाल यांच्यावर आरोप केले होते.
यामध्ये त्यांनी संजीव जयस्वाल 5 वर्षे 3 महिने ठाण्याचे आयुक्त असताना त्यांच्याविरोधात महिलेने तक्रार केली होती.

Pune Corona : दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात 367 रुग्ण ‘कोरोना’मुक्त
तसेच संजीव जयस्वाल यांनी गैरव्यवहार करुन संपत्ती गोळा केली आहे.
याची चौकशी व्हावी असा आरोप करत चौकशीची मागणी केली होती.
या आरोपांना उत्तर देताना संजीव जयस्वाल यांनी घाडीगावकर यांच्यावर गंभीर आरो केले आहेत.

हे देखील वाचा

 

Weather Alert ! पुण्यात पुढील 4 दिवस मुसळधार; रायगड, मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाला सुरुवात होणार

 

शॉम्पू केल्याच्या दुसर्‍याच दिवशी केस तेलकट होतात? ‘हे’ घरगुती उपाय येतील तुमच्या कामाला, जाणून घ्या

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  IAS | sanjeev jaiswals letterbomb serious allegations
against former congress corporator Sanjay Ghadigaokar