‘कोचिंग’ क्लास न लावता एका वर्षात तयारी केल्यानंतर IAS बनली ही डॉक्टर, अशी केली ‘प्लॅनिंग’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – MBBS च्या अभ्यासानंतर एमडीचा अभ्यास करत असताना मनात आयएएस बनण्याची इच्छा झाली आणि अर्तिका शुक्लाने त्या दिशेने वाटचाल सुरु केली. सोशल मीडियापासून सुरक्षित अंतर ठेवले आणि अर्तिका युपीएससीची परिक्षा पास झाली. जाणून घेऊयात एका डॉक्टरच्या आयएएस होण्याबद्दलचा प्रवास.

एका मुलाखतीदरम्यान डॉ अर्तिकाने सांगितले की, २०१४ मध्ये पहिल्यांदा त्यांनी सिव्हिल सर्व्हिसची तयारी सुरु केली होती. त्यानंतर एक वर्ष अभ्यास करून त्यांनी परीक्षा पास केली. युपीएससीच्या परीक्षेबाबत त्या म्हणतात, नियोजनबद्ध पद्धतीने परीक्षेची तयारी करून यश मिळवले आहे. तसेच अशा प्रकारच्या तयारीसाठी वयाची किंवा वेळेची मर्यादा येत नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.

इतर व्यक्तींना याबाबत सल्ला देताना अर्तिका सांगतात, प्री आणि मेन्स अशा दोनीही परीक्षा लक्षात घेऊन तयारी करणे गरजेचे आहे. लिहिण्याची तयारीसोबत मुलाखतीची तयारी देखील महत्वाची आहे. त्याचप्रमाणे अर्तिका यांनी परीक्षेची तयारी करत असताना स्वतःला सोशल मीडियापासून दूर ठेवल्याचे देखील सांगितले.

कोणत्याही प्रकारच्या कोचिंगचा आधार न घेता अर्तिका यांनी हे यश मिळवले आहे. केवळ जुन्या प्रश्नपत्रिका सोडवून देखील युपीएसीत यश मिळवता येत असल्याचे देखील त्यांनी सिद्ध केले आहे. जर दहावीपासूनच युपीएससीची तयारी केली तर लवकरच ही परीक्षा पास करता येऊ शकते असे अर्तिका यांनी सांगितले. मुलाखती बाबत बोलताना अर्तिका सांगते की तुम्हाला जर एखादे उत्तर येत नसेल तर त्याबाबतची स्पष्टता दाखवा आणि स्वतःबद्दल आत्मविश्वास असल्याचे दाखवून द्या.

Visit : Policenama.com