IAS बनण्याची ‘जिद्द’, सोडून दिली लाखोच्या पगाराची नोकरी, इंजिनिअर असा बनला UPSC चा ‘टॉपर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये अभियंत्याची चांगली नोकरी सोडून आयएएससाठी तयारी करणे इतके सोपे नाही. त्यात जर आपल्याला तीन वेळा अपयश आले तर हा प्रवास अधिक कठीण होत जातो. पण, वर्णित नेगींनी आपल्या स्मार्ट वर्क स्ट्रॅटेजीने हे अवघड काम करून दाखवलं. २०१८ मध्ये त्यांनी यूपीएससीमध्ये १३ वी रँक प्राप्त केली.

नेगी यांनी एका व्हिडीओ मुलाखतीत सांगितले की, त्यांनी यूपीएससीच्या तयारीसाठी कठोर परिश्रम न करता स्मार्ट वर्क करून यश संपादन केले आहे. ते जसपूरमध्ये लहानाचे मोठे झाले आहेत, जसपूर येथून सुरुवातीच्या अभ्यासानंतर त्यांनी बिलासपूरमधील डीएव्ही पब्लिक स्कूल मध्ये सातवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेतले. यानंतर राजस्थानमधून कोटा येथे अकरावी आणि बारावीचे शिक्षण घेतले.

एनआयटीमधून सिव्हिल इंजिनीअरिंग केल्यानंतर वर्ण‍ित यांनी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये इंजीनियरची नोकरी प्राप्त केली होती. इथल्या नोकरीदरम्यानही त्यांनी आयएएस बनून देशासाठी अधिक चांगले काम करण्याचे स्वप्न पाहिले होते.

आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी मार्च २०१६ मध्ये रिजाइन करण्याचा विचार त्यांच्या मनात येऊ लागला होता. ते म्हणतात की पहिल्या प्रयत्नात मी मुख्य परीक्षा पास होऊ शकलो नाही. दुसऱ्यांदा पुन्हा तयारी केली आणि ५०४ रँक त्यांनी मिळवली त्यामध्ये त्यांना सहाय्यक सुरक्षा आयुक्त रेल्वे संरक्षण दलाची ऑफर देण्यात आली. पण त्यांनी तिसर्‍या अटेंप्टची तयारी सुरू केली.

तिसऱ्यांदा त्यांना १३ वी रँक मिळाली. ते म्हणतात की यूपीएससीची तयारी ही अत्यंत डिमांडिंग स्वरूपाची असते. यासाठी, आपल्या जीवनात आणि तयारीच्या पद्धतींमध्ये बर्‍याच गोष्टींची आवश्यकता असते. पूर्वी मी असा विचार करायचो की असे लोक कोण आहेत जे लाखोंमध्ये टॉप १०० मध्ये येतात.

कौटुंबिक सहकार्य देखील महत्त्वपूर्ण असते
ते म्हणतात की तयारीसाठी आपल्याला सोशल मीडियाच्या अति वापर टाळून बाहेर पडावे लागते. यावेळी आपण लोकांपासून दूर राहतो त्यामुळे या काळात कौटुंबिक आधार सर्वात महत्वाचा असतो. ते म्हणतात की मी माझ्या यशाचे पहिले श्रेय माझ्या कुटुंबियांना देईल कारण त्यांनी मला मानसिकरित्या साथ दिली.

स्मार्ट मेहनत महत्वाची असते
ते म्हणतात की यूपीएससीची तयारी करण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक असतातच परंतु ते स्मार्टवर्क असले पाहिजे. जोपर्यंत आपण हुशारीने तयारी करत नाही तोपर्यंत यशस्वी होणे अवघड आहे. यासाठी धैर्य आणि सुसंगतता दोन्ही आवश्यक आहेत.

आपल्या मनाचे ऐकणे देखील महत्वाचे असते
ते म्हणतात की तयारी दरम्यान आपण आपल्या मनानुसार चालणे सर्वात महत्वाचे आहे, उदाहरणार्थ जेव्हा आपल्याला वाचनाची इच्छा असते तेव्हा आपण बरेच काही वाचू शकतो. मीसुद्धा मला हवे तेव्हाच अभ्यास करायचो. असेही घडले की जेव्हा मी बरेच दिवस अभ्यास केला नाही, तसेच काही काळ बराच अभ्यास करत राहिलो. ही खूप कठीण स्पर्धा आहे ज्यामध्ये आयआयटी, मेडिकल आणि सीएचे टॉपर्स येतात.

ही होती रणनीती
वर्णित म्हणतात, असे म्हटले जाते की पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तयारीमध्ये काही गोष्टींमध्ये समानता असते आणि काहींमध्ये फरक देखील असतो. काही समान अभ्यासक्रम आहेत, परंतु प्री मध्ये पर्याय असल्यास आपण परीक्षेच्या वेळी विषयांकडे पाहून त्यांना आठवू शकतो. परंतु मेन्स मध्ये सर्व विषय स्वत:ला आठवावेच लागतात. याची तयारी एकत्रितरित्या केली जाऊ शकते, परंतु कोणते विषय कसे तयार करावेत हे आपण स्मार्ट वर्क करून लक्षात ठेवले पाहिजे.

Visit : Policenama.com