home page top 1

यशोगाथा ! फक्त 2 मार्कांमुळे मागे पडलेला अक्षत 23 व्या वर्षी बनला IAS

पोलीसनामा ऑनलाईन : याठिकाणी आम्ही एका अशा IAS अधिकाऱ्याची कहाणी सांगणार आहोत ज्याला UPSC च्या पहिल्या प्रयत्नात केवळ २ मार्कांमुळे यशापासून दूर राहावे लागले होते. परंतु जेव्हा तो दुसऱ्यांदा परीक्षेस बसला तेव्हा त्याच्या यशाने सर्वांना चकित केले. या माणसाने देशभरात दुसरे स्थान मिळविले. वयाच्या २३ व्या वर्षी यूपीएससी परीक्षेला IAS गेलेल्या या अधिकाऱ्याचे नाव अक्षत जैन असे आहे. जाणून घेऊयात इतक्या लहान वयात आणि दुसऱ्या प्रयत्नात अक्षतने यश कसे मिळवले…

कौटुंबिक पार्श्वभूमी :
अक्षतचे वडील धरमचंद जैन हे राजस्थानच्या जयपूर येथील रहिवासी आहेत. ते भारतीय पोलिस सेवेत (IPS) कार्यरत आहेत आणि आई सिम्मी जैन भारतीय महसूल सेवेत (IRS) कार्यरत आहेत. हे दोघेही १९९१ च्या बॅचचे अधिकारी आहेत. अक्षतचे कुटुंब मूळचे टोंक येथील आहे. त्यांचे वडील राजस्थानात अतिरिक्त पोलिस महासंचालक पदावर काम करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, अक्षतला लहानपणापासूनच अभियांत्रिकीचा अभ्यास करण्याची आवड होती. म्हणूनच, जेईई ऍडव्हान्स ची कठोर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने आयआयटी गुवाहाटीमध्ये बीटेकसाठी  प्रवेश घेतला.

पालकांकडून यूपीएससीची प्रेरणा :
अक्षतला अभियांत्रिकी मध्ये शिक्षण पूर्ण केले, पण घरामध्ये आई आणि वडिलांनी नागरी सेवेशी जोडलेले पाहून त्याने भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचे ठरवले. म्हणूनच, सन २०१७ मध्ये बी.टेक पूर्ण केल्यानंतर त्यांने नागरी सेवेची तयारी सुरू केली.

संपूर्ण भारतात २ रा क्रमांक :
सन २०१७ मध्ये त्याने प्रथमच यूपीएससीची परीक्षा दिली. अवघ्या ३ महिन्यांच्या तयारीनंतर अक्षतने ही परीक्षा दिली पण तो केवळ २ मार्कांनी नापास झाला.   परंतु तरीही त्याने हार मानली नाही. तो प्रयत्न करीत राहिला. एक वेळ अशी आली की त्याने यूपीएससी परीक्षेत एक वर्षानंतर म्हणजे २०१८ मध्ये यश संपादन केले. अक्षतने संपूर्ण भारतात द्वितीय क्रमांक मिळविला.

यशाचा कानमंत्र :
अक्षतने तयारीसाठी एक रणनीती तयार केली होती, त्या अंतर्गत तो छोट्या छोट्या नोट्स बनवत असत. यामुळे त्याला रिव्हिजन करणे सोपे झाले. अक्षत जैन यांचा असा विश्वास आहे की अभ्यासक्रमानुसार आपण लहान नोट्स तयार केल्यास गोष्टी समजून घेणे आणि लक्षात ठेवणे सोपे होते.

visit: Policenama.com

Loading...
You might also like