गल्‍लीत क्रिकेट खेळायचा, स्वतःला बिनकामाचा समजायचा, आज बनलाय IAS

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कधीही कुणाला कमी समजायचे नसते. कुणी कधीही कोणत्या स्थानावर पोहोचेल याचा काही नेम नाही. राजस्थानमधील जोधपूरच्या एका व्यक्तीवर हे वाक्य अतिशय फिट बसत आहे. दिलीप सिंह शेखावत असे या व्यक्तीचे नाव असून तो शाळेत सरासरी हुशार विद्यार्थी होते.

मात्र आधी त्यांना तुम्हाला काय बनायचे आहे असा प्रश्न विचारला जात असे त्यावेळी त्यांचे उत्तर ठरलेले असायचे. मला मोठे व्हायचे नाही असे त्यांचे उत्तर ठरलेलं असायचे. मात्र मोठे झाल्यानंतर त्यांनी आयएएस होण्याचा विचार केला असता सर्व लोकांनी त्यांची थट्टा केली. दोन वेळा त्यांना यामध्ये अपयश देखील आले. मात्र त्यांनी हार न मानता प्रयत्न सुरूच ठेवले. आणि 2018 मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत 77 वी रँक मिळवली.

मोठं व्हायचं नव्हतं
दिलीप यांनी एका मुलाखतीत सांगितले होते कि, मला नेहमी लहानपणामध्ये रमायला आवडायचे. मोठे होऊन संकट पाहायची नव्हती. मात्र 12 वि नंतर मी इंजिनिअरिंगला प्रवेश घेतल्यानंतर मी केमिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. त्यानंतर मी नोकरी करण्यास सुरुवात केली.

सिनिअरनी दाखवला रस्ता
काम करत असताना सिनिअरकडून मला आयएएसची अधिक माहिती मिळाली. यामध्ये तुम्हाला नोकरीबरोबरच समाजसेवेची देखील संधी मिळते. त्यामुळे मी घरच्यांशी चर्चा करून हि परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनतर मी परीक्षेची तयारी करण्यासाठी दिल्लीला आलो.

डिप्रेशनवर मात करत यश
मात्र परीक्षा देत असताना माझ्या मनात नेहमी नकारात्मक विचार येत असतं. आजूबाजूचे विद्यार्थी अपयशी ठरत असताना मला देखील नाकारत्मकता येत असे. त्यामुळे मी डिप्रेशनमध्ये जात असे,. मात्र या सगळ्यावर मात करत मी यश मिळवले.

दोन प्रयत्नांमध्ये अपयश
पहिल्या प्रयत्नांत फेल झाल्याने आसपासच्या लोकांनी माझी थट्टा उडवली. मात्र मी खचून न जाता माझे प्रयत्न सुरूच ठेवले आणि शेवटी यश मिळवले. यादरम्यान घरच्यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या प्रयत्नांत ते मुलाखतीपर्यंत गेले, मात्र कमी आत्मविश्वास असल्याने यावेळी त्यांना अपयश आले. अखेर 2018 मध्ये त्यांना यामध्ये यश आले आणि त्यांनी 77 वी रँक मिळवली.

Visit : Policenama.com