कधी सिनेमाचे ‘तिकीट’ विकले तर कधी हॉटेलमध्ये ‘वेटर’च काम केलं, आज आहे IAS अधिकारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – UPSC परीक्षेत एक दोन वेळा नव्हे तर तब्बल 6 वेळा अपयशी ठरून देखील एका व्यक्तीने जिद्द न सोडता शेवटी यश मिळवलेच. जयागणेश नावाच्या या व्यक्तीने हे यश मिळवले असून आज आपण त्यांच्या या यशाबद्दल जाणून घेणार आहोत. जयागणेश हे खूप गरीब कुटुंबात वाढले असून त्यांचे वडील लेदर फॅक्ट्रीमध्ये सुपरवायझर म्हणून काम करत असत. त्यावेळी त्यांना केवळ साडेचार हजार रुपये मासिक वेतन मिळत असे. त्यामुळे कुटुंबाच्या पालनासह मुलांचा शिक्षणाचा खर्च करणे त्यांच्यासाठी अवघड गोष्ट होती. त्यामुळे जयागणेश हे उच्च शिक्षण घेऊ शकले नाहीत. मात्र आपल्या कुटुंबाला या परिस्थितीतून बाहेर काढायचे असा निश्चय त्यांनी केला.

12 वी मध्ये 91 टक्के
जयागणेश अभ्यासात फार हुशार होते. त्यांनी 12 वी मध्ये 91 टक्के मिळवत इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. यासाठी त्यांना स्कॉलरशिपची फार मदत झाली. मेकॅनिकल इंजिनिअरिंगला त्यांनी ऍडमिशन घेतले.

यामुळे सोडले काम
इंजनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर वेगळे काहीतरी करण्यासाठी त्यांनी काम सोडले. गावातील परिस्थिती पाहून त्यांनी जिल्हाधिकारी बनण्यासाठी आपली नोकरी सोडली आणि upsc चा अभ्यास सुरु केला.

वेटरची नोकरी केली
चेन्नईला आल्यानंतर आपला खर्च भागवण्यासाठी त्यांनी सत्यम सिनेमा हॉलमध्ये बिलिंग ऑपरेटर म्हणून नोकरी स्वीकारली. त्यानंतर 2004 मध्ये झालेल्या पहिला परिक्षते ते फेल गेले. त्यानंतर त्यांनी हि नोकरी सोडत वेटरची नोकरी पकडली. या नोकरीमध्ये त्यांना अभ्यासाला जास्त वेळ मिळत असे.

क्लास देखील घेतले
पहिल्या दोन प्रयत्नांत अपयशी ठरल्यानंतर त्यांनी एका क्लासमध्ये सोशिओलॉजी हा विषय शिकवण्यास सुरुवात केली. त्यानंतर 7 व्या प्रयत्नांत त्यांना यश आले आणि त्यांनी 156 वी रँक मिळवली.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like