कौतुकास्पद ! शेतकर्‍यानं कर्ज काढून शिकवल मुलाला, पोरानं UPSC मध्ये मिळवली 92 वी रँक

पोलीसनामा ऑनलाईन : आम्ही बऱ्याचदा अनेक लोकांच्या संघर्ष आणि यशाच्या कहाण्या प्रेरणादायी कहाण्या तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आज आम्ही एका अशा व्यक्तीची कहाणी सांगणार आहोत ज्याने वडिलांनी घेतलेल्या कर्जावर IAS ची तयारी केली आणि अधिकारी झाला. तयारीसाठी द्यायला पैसे नव्हते परंतु त्याची क्षमता आणि कष्ट करण्याची तयारी पाहून वडिलांनी कर्ज घेऊन मुलाला आयएएसची तयारी करायला लावले. त्याचवेळी मुलानेही याची जाणीव ठेऊन परीक्षेमध्ये ९२ वी रँक मिळवून एक आदर्श ठेवला.

बुलंदशहरमधील दलपतपूर गावचे रहिवासी असलेल्या वीर प्रताप सिंह यांच्या घराची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. तरीही मोठ्या कष्टाने त्यांनी अभ्यास केला. शालेय काळात, पुलाच्या अभावामुळे ते अनेकदा पोहून नदी ओलांडत आणि शाळेत जात. वीर यांनी आर्य समाज शाळा, कोरोरा येथून प्राथमिक शिक्षण घेतले. तर उच्च माध्यमिक शिक्षण विद्यालय सूरजभान सरस्वती विद्या मंदिर शिकारपूर येथून घेतले. यानंतर त्यांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठातून २०१५ मध्ये बीटेक (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) केले.

वडिलांनी कर्ज घेऊन शिक्षण पूर्ण केले :
अभियांत्रिकीनंतर वीर यांना यूपीएससी परीक्षेची तयारी करायची होती पण त्यांच्याकडे पैसे नव्हते. एका मुलाखतीत वीर यांनी सांगितले की वडिलांकडे शिकविण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते, परंतु त्यांना आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करायची असल्याने त्यांनी एका व्यक्तीकडून व्याजाने तीन महिन्यांसाठी पैसे घेतले.

अपयशानंतरही न खचता केली तयारी :
कर्जावर पैसे घेतल्यानंतर वीरने जीवतोड मेहनत घेऊन अभ्यास केला. तो दिवसरात्र फक्त आणि फक्त अभ्यासच करत असे. तथापि, पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये त्याला यश मिळाले नाही. या दरम्यान तो हताश देखील होता परंतु तरीही त्याने धीर धरला आणि तयारी सुरु ठेवली.

दिलेल्या एका मुलाखतीत वीर प्रताप यांनी हे यश तिसर्‍या प्रयत्नात मिळाल्याचे सांगितले. पहिल्यांदा २०१६ आणि २०१७ मध्येही त्यांनी परीक्षा दिली होती परंतु यावेळी अपयशच हाती आले. परंतु त्यानंतर अजून कठोर परिश्रम घेतले आणि २०१९ मध्ये संपूर्ण देशातून ९२ वी रँक मिळवत ते IAS झाले.

Visit : Policenama.com