IAS Sushil Khodvekar | TET Exam Scam प्रकरणात अटक करण्यात आलेले IAS सुशिल खोडवेकर कोण आहेत? जाणून घ्या आतापर्यंतच्या त्यांच्या पोस्टींग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – IAS Sushil Khodvekar | शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात (TET Exam Scam) पुणे पोलिसांच्या सायबर (Pune Cyber Police) विभागाने आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर (IAS Sushil Khodvekar) यांना अटक (Arrest) केली आहे. प्रशासकीय सेवेतील एवढ्या बड्या मोठ्या अधिकाऱ्याचा शिक्षक भरती घोटाळ्यात सहभाग आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

कोण आहेत सुशिल खोडवेकर ?
सुशिल खोडवेकर (IAS Sushil Khodvekar) हे 2011 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सुशिल खोडवेकर सध्या कृषी विभागाच्या उपसचिव पदावर (Deputy Secretary, Department of Agriculture) कार्यरत आहेत. टीईटी घोटाळा होत असताना सुशील खोडवेकर हे शिक्षण विभागाचे उपसचिव (Deputy Secretary, Department of Education) होते. टीईटी परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या जीए टेक्नॉलॉजीज (GA Technologies) कंपनीला शिक्षण परिषदेकडून 2020 मध्ये ब्लॅकलिस्ट करण्यात आले होते. मात्र, शिक्षण परिषदेचा निलंबित अध्यक्ष तुकाराम सुपे (Tukaram Supe) याच्या सांगण्यावरुन सुशील खोडवेकरने जीए टेक्नॉलॉजीज कंपनीला ब्लॅकलिस्टमधून बाहेर काढले आणि कंपनीला पुन्हा टीईटी परीक्षा घेण्याचे कंत्राट दिले.

 

सुशिल खोडवेकर यांच्या विषयी
खोडवेकर हे बीड जिल्ह्यातील (Beed District) परळी तालुक्यातील (Parali Taluka) खोडवा सावरगाव (Khodwa Savargaon) येथील आहेत. त्यांचे 1 ली ते 5 वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोडवा सावरगाव येथे झाले. त्यानंतर 6 वी ते 10 पर्यंतचे शिक्षण गढी येथील जवाहर नवोदय विद्यालयात (Jawahar Navodaya Vidyalaya) झाले. 11 वी आणि 12 वीचे शिक्षण तुळजापूर येथील नवोदय विद्यालयात झाले. पुढे बी. एससी. ठाणे (Thane) येथील ज्ञानसाधना महाविद्यालयातून पूर्ण केली. तर मुंबईतील माटूंगा (Matunga, Mumbai) येथील राम नारायण लोहिया कॉलेज मधून एम. एस्सीची पदवी घेतली.

एम.एस्सीची पदवी घेतल्यानंतर त्यांनी IAS ची तयारी सुरु केली. 2007 ते 2011 या कालावधीत UPSC परीक्षा दिल्या. 2010 च्या परीक्षेत देशात 311 व्या रँकने ते उत्तीर्ण झाले. 2011 च्या बॅचला महाराष्ट्र केडर मिळाले. 2012-13 मध्ये प्रथम प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी (Assistant Collector Latur) म्हणून लातूर येथे रुजू झाले. त्यानंतर ऑगस्ट 2013 ते जानेवारी 2015 या कालावधीत ठाणे व पालघर येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामध्ये (Integrated Tribal Development Project) काम केले.

 

फेब्रुवारी 2015 ते एप्रिल 2016 पर्यंत नांदेड वाघाळा महापालिकेत आयुक्त (Commissioner, Nanded Waghala Municipal Corporation) म्हणून काम पाहिले.
तर 2016 मध्ये परभणी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) म्हणून काम केले.
2017 मध्ये पुणे येथे महाराष्ट्र कृषी स्पर्धात्मक प्रकल्पाच्या संचालकपदी बदली झाली.
टीईटी घोटाळा होत असताना सुशील खोडवेकर हे शिक्षण विभागाचे उपसचिव होते.

 

Web Title :- IAS Sushil Khodvekar | Who is IAS Sushil Khodvekar arrested in TET Exam Scam case Know their postings so far

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा