IAS टॉपर टीना डाबी आणि तिचा नवरा अतहर आमिर यांनी केला कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज, 2018 मध्ये केला होता विवाह

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सिव्हिल सर्व्हिस परीक्षेत अव्वल राहिलेल्या टीना डाबी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. टीना डाबीने तिच्या बॅचच्या आयएएस अतहर आमीरशी लग्न केले. या तरुण आयएएस दाम्पत्याने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. जयपूरच्या फॅमिली कोर्ट -1 मध्ये आयएएस टॉपर टीना डाबी आणि तिचा नवरा अतहर आमिर यांनी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. आम्ही एकत्र राहू शकत नाही, असे याचिकेत म्हटले आहे. अशा परिस्थितीत कोर्टाने आमचे लग्न शून्य म्हणून घोषित केले पाहिजे.

दरम्यान, हे दोघेही 2016 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या टीना सहसचिव आणि आमिर मुख्य कार्यकारी अधिकारी ईजीएस म्हणून वित्त विभागात कार्यरत आहेत. 2018 मध्ये दोघांचे लग्न खूप गाजले होते.

यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा 2015 मध्ये अव्वल राहिलेल्या टीनाने एप्रिल 2018 मध्ये अतहरशी लग्न केले. 2015 च्या यूपीएससी परीक्षेत काश्मीरच्या अतहरने द्वितीय क्रमांक मिळविला होता. टीना आणि अतहर हे दोघेही राजस्थान केडरचे अधिकारी आहेत. असे म्हणतात की प्रशिक्षणादरम्यान या दोघांची जवळीक वाढली.

काही दिवसांपूर्वी काढले होते आडनाव
टीना डाबी यूपीएससी परीक्षेत अव्वल राहिल्यानंतर सतत माध्यमांच्या चर्चेत राहिल्या आहेत. लग्नानंतर टीनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘खान’ आडनाव जोडून काश्मिरी सूनेचा टॅग जोडला होता. काही दिवसांपूर्वी तिने आपल्या आडनावातून खान हा शब्द काढून टाकला. यातूनच टीनाने स्वत: च्या फॉलोअर्सला सांगितले की तिने ट्विटरवर आपल्या पतीला अनफॉलो केले आहे. तसेच, तिने आपल्या पतीला इन्स्टाग्रामवर फॉलो केले नाही.