IAS Transfer | राज्यातील 14 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रताप जाधव यांची ‘यशदा’च्या उप महासंचालक पदी नियुक्ती

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  IAS Transfer | राज्य सरकारने शुक्रवारी (दि.30) भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS Transfer) 14 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये पुणे महसूल विभागाचे (Pune Revenue Department) उपायुक्त प्रताप जाधव यांची उप महासंचालक, यशदा, पुणे (Deputy Director General, Yashada) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

 

बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आणि त्यापुढे कोठून कोठे बदली झाली.

1. संजय दैने (Sanjay Daine) – अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, मालेगाव महानगरपालिका.

2. अनिल पाटील (Anil Patil) – व्यवस्थापकीय संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई यांची नियुक्ती सचिव, प्रदेश नियंत्रण प्राधिकरण, मुंबई या पदावर.

3. मलीकनेर (Malikner) – सहमुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी, मुंबई यांची नियुक्ती आहे त्याच पदी.

4. सुरेश जाधव (Suresh Jadhav) – यांची नियुक्ती आयुक्त, कामगार महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदावर.

5. प्रताप जाधव (Pratap Jadhav) – उपायुक्त, पुणे महसूल विभाग, पुणे यांची नियुक्ती उप महासंचालक, यशदा, पुणे या पदी.

6. कुमार खैरे (Kumar Khaire) – यांची नियुक्ती सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास मंडळ या पदावर.

7. जी एम बोडके (G M Bodke) -सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कल्याण यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, अकोला महानगरपालिका या पदावर.

 

8. एस जी देशमुख (S G Deshmukh) – अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे यांचे नियुक्ती अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक, मुंबई या पदावर.

9. एम देवेंद्र सिंह (M Devendra Singh) – यांची नियुक्ती संचालक, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे या पदावर.

10. राहुल कर्डिले (Rahul Kardile) – यांची सह महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या पदावर.

11. जी एस पापळकर (G S Papalkar) – यांची नियुक्ती जिल्हाधिकारी, हिंगोली या पदावर.

12. रुचेश जयवंशी (Ruchesh Jayavanshi) – जिल्हाधिकारी, हिंगोली यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला या पदावर.

13. एन आर गटणे (N R Gatne) – अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, पालघर यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड या पदावर.

14. दीपेंद्रसिंह कुशवाह (Deependra Singh Kushwaha) – आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, नवी मुंबई यांची नियुक्ती सहसचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर.

 

Web Title : IAS Transfer | Transfer of 14 IAS officers in the state, appointment of Pratap Jadhav as Deputy Director General of ‘Yashada’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Police | ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल डीसीपींनी सर्व काही स्पष्टच सांगितलं; IPS प्रियांका नारनवरे म्हणाल्या – ‘काही वरिष्टांच्या मार्गदर्शनाखाली….’ (ऑडिओ क्लिप)

Shilpa Shetty | शिल्पा शेट्टी संदर्भात माध्यमांत बदनामीकारक बातम्या, हायकोर्टाने दिले ‘हे’ निर्देश

MS Dhoni | महेंद्र सिंह धोनीचा नवा लुक सोशल मीडियावर Viral, कॅप्टन कूलची ही स्टाईल चाहत्यांना सुद्धा खुप आवडली