IAS Transfers : राज्यातील 6 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, मिलिंद म्हैसकर यांची गृहनिर्माण प्रधान सचिवपदी नियुक्ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारकडून 6 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्याच्या गृहनिर्माण प्रधान सचिवपदी मिलिंद म्हैसकर, (milind mhaiskar) तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) महानगर आयुक्तपदी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. MMRDAच्या महानगर आयुक्तपदी कार्यरत असलेल्या आर.ए. राजीव यांचा कालावधी संपुष्टात आला होता. त्यानंतर या पदाचा अतिरिक्त कार्यभार अतिरिक्त महानगर आयुक्त सोनिया सेठी यांच्याकडे सोपवण्यात आला होता.

Maharashtra Unlock : राज्यात 5 टप्प्यात होणार अनलॉक, मात्र पुण्यात लॉकडाऊन; जाणून घ्या कारण ?

राज्याच्या गृहनिर्माण प्रधान सचिवपदी नियुक्त झालेले मिलिंद म्हैसकर (milind mhaiskar) हे 1992 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, याशिवाय ते महसूल आणि वन विभागातही प्रधान सचिव म्हणून कार्यरत होते. तर MMRDA महानगरच्या आयुक्तपदी नियुक्त झालेले एस.व्ही.आर. श्रीनिवास हे 1991 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. एमएमआरडीए महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांना मुदतवाढ नाकारण्यात आल्याने ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरु झाली होती.

बदली झालेल्या IAS अधिकाऱ्याचे नाव कंसात कोठून कोठे बदली झाली
1) एस व्ही आर श्रीनिवास, प्रधान सचिव, गृहनिर्माण यांची नियुक्ती महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई या पदावर

2) लोकेश चंद्रा, प्रधान सचिव र.व का. यांची नियुक्ती महाव्यवस्थापक, बेस्ट, मुंबई पदावर.

3) मिलिंद म्हैसकर, प्रधान सचिव (वने) यांची नियुक्ती प्रधान सचिव,(गृहनिर्माण) या पदावर

4) विकास चंद्र रस्तोगी यांची नियुक्ती प्रधान सचिव (र.व का.), सामान्य प्रशासन विभाग पदावर

5) बी वेणुगोपाल रेड्डी, व्यवस्थापकीय संचालक, सिकॉम् यांची नियुक्ती प्रधान सचिव वने या पदावर

6) सुमंत भांगे, व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ यांची नियुक्ती सचिव,सा.वि.स. आणि वि.चौ.अ.(2) या पदावर

READ ALSO THIS :

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; जाणून घ्या

मुंबईत प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, किचनमध्ये पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य 6 वर्षाच्या मुलीने सांगितले

Photos : 133 किलो होते वजन, आयपीएस अधिकाऱ्यानं 9 महिन्यात कमी केलं 43 किलो वजन, वायरल झाली छायाचित्रे