माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरात तुकाराम मुंढेंची बदली, ‘या’ पदाचा स्विकारणार ‘पदभार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी (मुंबई) येथे प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत असलेल्या तुकाराम मुंढे यांची नागपूरच्या महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरात मुंढेंची बदली केल्याने महाविकास सरकार कोणत्या दिशेने पावले उचलत आहे याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मुंढेंच्या बदलीचे आदेश अप्पर मुख्य सचिव (सेवा) सीताराम कुंटे यांनी काढले आहेत.

tukaram munde

नागपूरमध्ये महापालिका आयुक्त म्हणून सध्या अभिजित बांगर (भाप्रसे) हे कार्यरत आहेत. त्यांच्या जागी मुंढेंची नियुक्ती करण्यात आली असून ते पद निवड श्रेणीत उन्नत करण्यात आले आहे. मुंढे हे सध्या महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी (मुंबई) येथे प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होते. आता त्यांची नागपूर महापालिकेत आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

फेसबुक पेज लाईक करा –