नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना ‘कोरोना’ !

पोलिसनामा ऑनलाईन – नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरद्वारे ही माहिती दिली. संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करण्याची विनंतीही त्यांनी केली. दरम्यान, त्यांच्या कुटूंबियांची चाचणी करण्यात येणार आहे.

माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मला कोणतीही लक्षणे नाहीत, पण नियमानुसार मी स्वत:ला आयसोलेट केले आहे. मी विनंती करतो की, मागील 14 दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करावी. नागपूरमधील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी मी घरातूनच काम करत आहे. आपण नक्कीच जिंकू, असे  मुंढे यांनी ट्वीटमध्ये नमूद केले आहे.

नागपुरातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी  मुंढे यांनी अनेक कठोर पावले उचलली आहेत.  परिणामी लोकप्रतिनिधींसह व्यापारी वर्गाने त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली.  कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी मुंढे यांनी अनेक मास्टरप्लॅन केले आहेत. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी बेड उपलब्ध व्हावेत आणि या रुग्णांची कोणतीही लुटमार होऊ नये यासाठी  तुकाराम मुंढे यांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे.