IAS Vikram Kumar | जी २० पुर्वी १३ जानेवारीला पुण्यात ५० महापालिका आयुक्तांची परिषद; ‘भविष्यातील शहरे’ विषयावर आयुक्तांचे होणार विचारमंथन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – IAS Vikram Kumar | जी २० परिषदेपुर्वी येत्या १३ तारखेला देशातील सुमारे ५० महापालिकांच्या Pune Municipal Corporation (PMC) आयुक्तांची पुण्यामध्ये परिषद होणार आहे. या परिषदेमध्ये ‘भविष्यातील शहरे’ या विषयाला अनुसरून नैसर्गिक आपत्ती, पर्यावरण आणि महापालिकांचे आर्थिक धोरण यावर माहितीचे आदान प्रदान, ग्रुप डिस्कशन आणि तज्ञांचे मार्गदर्शन केले जाणार आहे, अशी माहीती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी दिली.

 

पुण्यामध्ये जी २० निमित्ताने येत्या १६ आणि १७ जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींची परिषद होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर १३ जानेवारीला देशभरातील ५० महापालिकांच्या आयुक्तांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे संयोजन करण्याची संधी पुणे महाापलिकेला मिळाली असून त्यादृष्टीने तयारी करण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी दिली.

 

विक्रम कुमार यांनी सांगितले, की केंद्र शासनाच्या आदेशानुसारच ही परिषद आयोजित करण्यात येत आहे.
या परिषदेसाठी सूरत, चेन्नई, अहमदाबाद, भोपालसह राज्यातील व अन्य राज्यातील महापालिका आयुक्तांना निमंत्रीत करण्यात येत आहे.
यानिमित्ताने शहरांपुढील भविष्यातील आव्हाने याविषयावर माहितीचे आदान प्रदान, तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.

प्रामुख्याने शहरांना नैसर्गिक आपत्तीशी करावा लागणारा सामना, पर्यावरण पूरक शहरांसाठीच्या उपाययोजना,
महापालिका आर्थिकदृष्टया सक्षम होण्यासाठी उचलावी लागणारी पावले आदींबाबत विविध शहरांमध्ये राबविण्यात येणार्‍या योजना,
प्रकल्पांची माहीती शेअर करण्यात येईल. तसेच या विषयातील तज्ज्ञ देखिल मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी मिळकत कर विभाग, नदी सुधार,
तसेच पर्यावरणाबाबत केलेल्या कामांचे सादरीकरण पुणे महापालिकेच्यावतीने करण्यात येईल.

 

Web Title :- IAS Vikram Kumar | A conference of 50 municipal commissioners in Pune on January 13 before G20; Commissioners will brainstorm on the topic of ‘Future Cities’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political Crisis | सत्तासंघर्षावर अजित पवारांची प्रतिक्रिया म्हणाले, ‘न्यायव्यवस्थेला कोणी…’

Ajit Pawar | अजित पवार यांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा; म्हणाले…

Pune Pimpri Crime | मला तू कॉलेजपासून आवडते म्हणत महिलेसोबत गैरवर्तन, आरोपी गजाआड; तळेगाव दाभाडे येथील घटना