दिल्ली दंगल : PM रिपेार्टमध्ये खुलासा ! IB कॉन्स्टेबल अंकित शर्मांवर चाकूने झाले होते 12 वार, शरीरावर जखमांचे 51 व्रण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ईशान्य दिल्लीतील हिंसाचारात ठार झालेल्या अंकित शर्माचा पोस्टमॉर्टम अहवाल समोर आला आहे. इंटेलिजेंस ब्युरोमध्ये तैनात असलेल्या अंकित शर्माच्या पोस्टमॉर्टम अहवालानुसार त्याच्या शरीरावर एकूण ५१ जखमा झाल्या आहेत. यापैकी मांडी, पाय, छातीसह शरीराच्या मागील बाजूस चाकूच्या १२ खुणा होत्या.पोस्टमॉर्टेम अहवालाचा हवाला देत सांगितले की, अंकित शर्माच्या शरीरावर चाकूने वार केल्याच्या गंभीर खुणा सापडल्या आहेत. पोस्टमॉर्टम अहवालानुसार ६ कटचे निशाण होते ज्यात स्क्रॅच निशाण होते. उर्वरित ३३ जखमा होत्या ज्यात अंकितच्या डोक्यावर आणि शरीरावर रॉड्स आणि दांडके अशा जड वस्तूंनी वार केले होते. तसेच शरीरावर बहुतेक लाल, जांभळे, निळ्या रंगाचे निशान सापडले आहेत. त्यापैकी बहुतेक मांड्या आणि खांद्यावर होते.

यापूर्वी अंकित शर्माच्या अंगावर सुमारे ४०० जखमा असल्याचे सांगण्यात आले होते. अगदी गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेतील एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांना उत्तर देतानाही अंकित शर्माच्या मृत्यूचा उल्लेख केला. अमित शहा म्हणाले होते की, “आयबीचे अधिकारी शर्मा यांच्या अंगावर ४०० जखमा झाल्या आहेत. ते पण बोलले असते तर सभागृहाची शोभा वाढली असती.” तसेच अमित शहा यांनी लोकसभेत खुलासा केला होता की, अंकित शर्माच्या हत्येच्या चौकशीत गुंतलेली एसआयटीला महत्त्वाचा संकेत मिळाला आहे. अंकित शर्माच्या हत्येची रहस्ये एसडीआयला मिळाली आहे. हा व्हिडिओ सामान्य नागरिकाने पाठविला आहे.

दरम्यान, आयबी कॉन्स्टेबल अंकित शर्मा आपल्या कुटुंबासमवेत ईशान्य दिल्लीत राहत होता. हिंसाचाराच्या वेळी त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. चाकूने वार करून गंभीर मारहाण करून अंकितचा मृत्यू झाला. अंकित शर्माचा मृतदेह २६ फेब्रुवारी रोजी चांदबागमधील नाल्यातून सापडला. अंकित २५ फेब्रुवारीला बेपत्ता झाला होता. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार ते ऑफिसमधून बाहेरच्या लोकांना समजावयाला आले होते, तेव्हा ताहिरच्या घराबाहेर जमावाने त्याला पकडून मारहाण केली आणि चाकूंनी हल्ला केला. या हिंसाचारादरम्यान ताहिर हुसेनच्या समर्थकांनी अंकितला फरफडत नेऊन त्याचा मृतदेह नाल्यात फेकून दिल्याचा आरोप अंकितच्या कुटुंबियांनी केला आहे. सध्या या प्रकरणात सलमान नावाच्या व्यक्तीस अटक करण्यात आली असून अद्याप अनेकांना अटक होणे बाकी आहे.

नुकसान भरपाईची देणार असल्याची घोषणा :
दिल्ली सरकारने अंकित शर्माच्या कुटूंबाला १ कोटी रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही नुकसान भरपाई जाहीर केली. भरपाई व्यतिरिक्त, दिल्ली सरकारने कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी जाहीर केली.