IBPS Clerk 2020 : 2557 लिपिक भरतीसाठी अर्ज सुरू, उर्वरित उमेदवारांसाठी आयबीपीएसने ओपन केली ॲप्लिकेशन विंडो

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयबीपीएसने लिपिक भरती परीक्षा 2020 च्या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या 2557 पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पुन्हा उघडण्याची घोषणा केली होती. त्याअंतर्गत आज, 23 ऑक्टोबरपासून ऑनलाइन नोंदणी सुरू झाल्या आहेत. अशा परिस्थितीत, ज्या उमेदवारांना यापूर्वी अर्ज करणे शक्य नव्हते ते अधिकृत वेबसाइट ibps.in. वर अर्ज करू शकतात. याव्यतिरिक्त, आयबीपीएसने 6 नोव्हेंबर 2020 पर्यंत पात्रता (पदवी) उत्तीर्ण उमेदवारांना देखील संधी दिली आहे.

तत्पूर्वी, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनने (आयबीपीएस) सीआरपी लिपिक – एक्स भरती 2021 – 22 च्या 2557 पदांसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली होती. 19 ऑक्टोबरला ibps.in च्या अधिकृत संकेतस्थळावर संस्थेने जाहीर केलेल्या सप्लीमेंट्री जाहिरातीनुसार उमेदवार आता 23 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2020 या कालावधीत आयबीपीएस लिपिक भरती 2020 च्या अर्ज प्रक्रियेद्वारे अर्ज करू शकतात. आयबीपीएसने या पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 23 ऑक्टोबरपासून सुरू करण्याची घोषणा केली असून ते 6 नोव्हेंबर 2020 पर्यंत चालतील.

कोण अर्ज करू शकेल ?
आयबीपीएस लिपीक भरतीसाठी फक्त असे उमेदवार ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही विषयात बॅचलर पदवी उत्तीर्ण केली असेल आणि 6 नोव्हेंबर 2020 रोजी 20 वर्षांपेक्षा कमी व 28 वर्षांपेक्षा जास्त नसतील.

या बँकांमध्ये होत आहे भरती :
बँक ऑफ बडोदा
कॅनरा बँक
इंडियन ओव्हरसीज बँक
युको बँक
बँक ऑफ इंडिया
सेंट्रल बँक ऑफ इंडिया
पंजाब नॅशनल बँक
युनियन बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ महाराष्ट्र
इंडियन बँक
पंजाब आणि सिंध बँक

दरम्यान, आयबीपीएसने गेल्या महिन्यात विविध सार्वजनिक बँकांमध्ये 1557 लिपिक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली होती, नंतर रिक्त पदांची संख्या 2557 करण्यात आली. त्याच वेळी, सीआरपी लिपिक-एक्स भरती 2021 – 22 च्या अधिसूचनेनुसार, प्राथमिक परीक्षा 5, 12 आणि 13 डिसेंबर 2020 रोजी घेण्यात येणार आहे.