बँकिंग क्षेत्रात भरती, वर्षाला 9 लाख रूपयांपेक्षा जास्त कमवा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल (IBPS) रिसर्च असोसिएट (टेक्निकल) आणि डेप्युटी मॅनेजर (अकाउंट्स) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी 18 ऑक्टोबरपासून 1 नोव्हेंबर पर्यंत आयबीपीएसच्या (IBPS) च्या ibps.in या आधिकृत वेबसाइटवरुन ऑनलाइन अर्ज करु शकतात. या पदांवर निवड होणाऱ्या उमेदवाराला वर्षाला 9 लाखपेक्षा जास्तीचे पॅकेज मिळेल.

निवड प्रक्रिया
या पदावर नोकरी मिळण्यासाठी उमेदवाराला लेखी परिक्षा, ग्रुप एक्सरसाइज आणि मुलाखत द्यावी लागेल. ही भरती रिसर्च असोसिएट (टेक्निकल) आणि डेप्युटी मॅनेजर (अकाउंट) या दोन पदांसाठी असेल.

शैक्षणिक पात्रता
रिसर्च असोसिएट या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी एम. टेक. किंवा एम. ए. ही डिग्री असणे आवश्यक आहे. डेप्युटी मॅनेजर या पदांसाठी उमेदवारांना सीए असणे आवश्यक आहे. तसेच या पदांसाठी उमेदवारांना कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 30 वर्ष असणे आवश्यक आहे.

असा करा अर्ज
1. उमेदवाराला सर्वात आधी ibps.in या आधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

2. होमपेजवर ‘apply for several posts’ अशी लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.

3. advertisement for the post of research associate या लिंकवर क्लिक करा.

4. अ‍ॅप्लिकेशन या लिंकवर क्लिक करा.

5. रजिस्ट्रेशन करुन अर्जात आपली आवश्यक माहिती भरावी.

6. परिक्षा शुल्क तुम्ही यावरच ऑनलाइन पद्धतीने भरु शकतात.

अर्जाचे शुल्क
उमेदवारांना अर्ज केल्यानंतर 500 रुपये परिक्षा शुल्क द्यावे लागेल, जे शुल्क रिफंड होणार नाही.

वेतनमान
निवड झालेल्या उमेदवारांना 9,36,020 रुपये वेतन प्रति वर्ष असेल. याशिवाय पीएफ, ग्रॅच्युइटी, एलटीसी, घर, मेडिकल काॅम्पनसेशन आणि विमा इत्यादी सुविधा मिळतील.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like