IBPS | पदवीधरांसाठी सुवर्णसंधी ! सरकारी बँकांमध्ये 7855 क्लर्क पदांसाठी आयबीपीएसकडून आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  IBPS | विविध सरकारी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये क्लर्कच्या पदांवर (Job in bank) भरतीसाठी ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया आज 7 ऑक्टोबर 2021 पासून सुरू करण्यात आली आहे. जर तुम्ही कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून पदवीधर झालेले असाल किंवा समकक्ष पात्रता असेल तर 7 हजारपेक्षा जास्त क्लार्कच्या जागासाठी निवड प्रक्रिया आयोजित करणार्‍या बॉडी इन्स्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) द्वारे अधिकृत वेबसाइट ibps.in वर ओपन करण्यात आलेल्या ऑनलाइन अ‍ॅप्लीकेशन विंडोच्या माध्यमातून अर्ज करू शकता. आयबीपीएस अर्जाची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021 आहे.

आयबीपीएसद्वारे ( ज्या बँकांनी रिक्त जागा घोषित केल्या आहेत त्यामध्ये बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब आणि सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियाचा समावेश आहे. या बँकांमध्ये देशातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कॅटेगरीनुसार रिक्त जागा भरल्या जातील.

– या लिंकद्वारे पहा 7855 क्लर्क भरतीची नवीन जाहीरात

https://www.ibps.in/wp-content/uploads/FinalAdvtCRPCLERKSXI.pdf

– येथे करा अर्ज

https://ibpsonline.ibps.in/crpcl11jun21/

जुलै 2021 मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करू नये. आयबीपीएसने आज, 7 ऑक्टोबरला 2021 पुन्हा नवीन जाहिरातीत रिक्त जागा वाढवून त्या 7855 केल्या आहेत.

 

आयबीपीएस क्लर्क भरती 2021 : महत्वाच्या गोष्टी

 एकुण पदांची संख्या – 7855 पदे

 पात्रता – पदवीधर आणि वय 1 सप्टेंबर 2021 ला 20-28 वर्ष

 अर्ज सुरू झाल्याची तारीख – 7 ऑक्टोबर 2021

  समाप्त होण्याची तारीख – 27 ऑक्टोबर 2021

अर्ज शुल्क – SC/ST/PWBD/EXSM उमेदवारांसाठी 175 रुपये आणि इतर सर्वांसाठी 850 रुपये

 

Web Title : IBPS | ibps reopens 7855 clerk recruitment application window today at ibpsonline ibps in graduates get massive jobs in nationalized banks

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Today | खुशखबर ! नवरात्रीच्या शुभमुहूर्तावरही सोन्याच्या दरात ‘घसरण’, जाणून घ्या

Pune Police Crime Branch | पुण्यातील व्यापार्‍याकडे 2 लाखाच्या खंडणीची मागणी; हॉटेल ‘हयात रिजेन्सी’ मध्ये विशाल उर्फ जंगल्या सातपुतेसह तिघांना अटक

Corporator Archana Tushar Patil | आता सुरु होणार पुणे महापालिकेतर्फे सावित्रीबाई फुले शैक्षणिक पुरस्कार ! नगरसेविका अर्चना पाटील यांच्या मागणीला यश