बँकिंग क्षेत्रात करिअर करणार्‍यांसाठी सुवर्णसंधी ! ‘क्लर्क’च्या 12000 जागांसाठी मेगाभरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – इंडियन बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने क्लार्क  पदांसाठी अर्ज मागवले आहेत, ज्यामाध्यामातून विविध बँकांमध्ये 12075 पदावर नियुक्ती केली जाईल. जे उमेदवार बँकिंग क्षेत्रात करियर घडवू इच्छितात ते या पदासाठी अर्ज करु शकतात. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 ऑक्टोबर आहे.

महत्वाच्या तारखा –
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 9 ऑक्टोबर 2019

प्रिलिम्स परिक्षाची तारीख – 07,08,10 आणि 21 डिसेंबर 2019

मेन्स परिक्षेची तारीख – 19 जानेवारी 2020

निवड पात्रता –
ज्या उमेदवाराने मान्यता प्राप्त संस्थेतून पदवी प्राप्त केली आहे ते उमेदवार येथे अर्ज करु शकतात. या पदासाठी अर्ज करणाऱ्यांचे वय 20 ते 28 दरम्यान असावे. आरक्षित उमेदवारांना वयात सूट आहे.

अर्जासाठीचे शुल्क –
जनरल आणि ओबीसी उमेदवारांसाठी 600 रुपये अर्जाचे शुक्ल आहे. तर SC/ ST/PWD उमेदवारांसाठी 100 रुपये शुक्ल आहे. शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरता येईल.

कशी होईल निवड –
अर्जदाराला ibps.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. उमेदवारांची निवड ऑनलाइन परिक्षेद्वारे करण्यात येईल. परिक्षेचे आयोजन 2 टप्प्यात करण्यात येईल. पहिल्यांदा प्रिलिम्स आणि त्यानंतर मेन्सची परिक्षा घेण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना पे स्केल 7200 – 19300 रुपये वेतन असेल.

येथे करा अर्ज –
उमेदारवाराला ibps.in या वेबसाइटवर अर्ज भरावा लागेल.

Visit : Policenama.com