बँकिंग क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी ; IBPS कडून ८४०० पदांची मेगाभरती

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बँकिंग क्षेत्रातील नोकर भरती साठीची संस्था इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पेर्सोनेल सिलेक्शन (IBPS) कडून ८४०० पदांची मेगाभरती करण्यात येत आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ४ जुलै २०१९ हि असणार आहे. बँकेतील अधिकारीपदासाठी हि भरती होणार असून पदवीधारक तसेच संबंधित विषयांतील पदव्युत्तर पदवीधारकांसाठी हि सुवर्णसंधी आहे. यासाठीची परिक्षा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा २ टप्प्यांमध्ये होईल.

१. पदाचे नाव :ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)
पदसंख्या : ३६८८
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट: १८ ते २८ वर्षे

२. पदाचे नाव :ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर)
पदसंख्या : ३३८१
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट: १८ ते ३० वर्षे

३. पदाचे नाव : ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी)
पदसंख्या : १०६
शैक्षणिक पात्रता:(i) ५०% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष (ii) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट: २१ ते ३२ वर्षे

४.पदाचे नाव : ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर)
पदसंख्या : ४५
शैक्षणिक पात्रता: (i) MBA (Marketing) (ii) ०१ वर्ष अनुभव
वयाची अट: २१ ते ३२ वर्षे

५. पदाचे नाव : ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर)
पदसंख्या : ११
शैक्षणिक पात्रता: (i) CA/MBA (Finance) (ii) ०१ वर्ष अनुभव
वयाची अट: २१ ते ३२ वर्षे

६. पदाचे नाव :ऑफिसर स्केल-II (लॉ)
पदसंख्या : १९
शैक्षणिक पात्रता: (i) ५०% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट: २१ ते ३२ वर्षे

७. पदाचे नाव : ऑफिसर स्केल-II (CA)
पदसंख्या : २४
शैक्षणिक पात्रता: (i) CA (ii) ०१ वर्ष अनुभव
वयाची अट: २१ ते ३२ वर्षे

८.पदाचे नाव : ऑफिसर स्केल-II (IT)
पदसंख्या : ७६
शैक्षणिक पात्रता: (i) ५० % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी (ii) ०१ वर्ष अनुभव
वयाची अट: २१ ते ३२ वर्षे

९. पदाचे नाव : ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर)
पदसंख्या : ८९३
शैक्षणिक पात्रता: (i) ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट: २१ ते ३२ वर्षे

१०. पदाचे नाव : ऑफिसर स्केल-III (सिनिअर मॅनेजर)
पदसंख्या : १५७
शैक्षणिक पात्रता: (i) ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) ०५ वर्षे अनुभव
वयाची अट: २१ ते ४० वर्षे

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क : General/OBC: ₹६००/- (SC/ST/PWD/ExSM :₹१००/-)

वयासंबंधी अधिक माहिती : ०१ जून २०१९ रोजी असणारे वय गृहीत धरले जाईल. [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०४ जुलै २०१९

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक : https://ibpsonline.ibps.in/rrb8a23jun19/

अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात या लिंक वर पहा : https://bit.ly/31Cixro