IBPS SBI Clerk admit card 2020: ‘प्रवेशपत्र’ जारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सेलेक्शन (IBPS) एसबीआय लिपिक २०२० (ISBI Clerk 2020) चे प्रवेशपत्र उद्या ११ फेब्रुवारी रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, जे उमेदवार या परीक्षेस बसणार आहेत असे उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co in वर भेट देऊन कार्ड डाउनलोड करू शकतात.

उमेदवारांनी लक्षात घ्यावे की प्रवेशपत्र मिळण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०२० आहे. या तारखेच्या आधी उमेदवार आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. यावर्षी ही परीक्षा देशभराच्या बँकांमधील एकूण ८१३४ पदे भरण्यासाठी घेण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २६ जानेवारी, २०२० रोजी संपली होती. मुख्य परीक्षा १९ एप्रिल रोजी होणार आहे. तसेच परीक्षेसंदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट तपासत राहावी, जेणेकरून कोणतीही माहिती आपल्यापासून सुटणार नाही.

IBPS SBI Clerk admit card 2020: असे करा डाउनलोड

SBI ची अधिकृत वेबसाईट sbi.co वर जा

मुख्यपृष्ठावरील करिअर लिंकवर क्लिक करा

येथे दिलेल्या SBI Clerk परीक्षा लिंक वर जा

आता येथे आयडी आणि पासवर्ड ची पूर्ण माहिती प्रविष्ट करा

आता प्रवेशपत्र तुमच्या समोर उघडेल

अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड करा

प्रिंटआउट काढून जवळ असू द्या