खुशखबर ! बँकिंग क्षेत्रात नोकरीची इच्छा असणार्‍यांसाठी ‘सुवर्णसंधी’, तब्बल 4366 जागांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयबीपीएस पीओ पदाच्या भरतीला सुरुवात झाली आहे. त्यासाठी अर्ज मागवण्याची अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन प्रोबेशनरी ऑफिसरच्या पदासाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. आयबीपीएसची अधीकृत साईट ibps.in वरून अधिकची माहिती मिळवता येईल.

या पदावर होणारी भरती ही एकूण ४३६६ जागांवर आहे. तसंच ७ ऑगस्ट २०१९ पासून अर्ज करता येणार आहेत. तसंच हा अर्ज करण्याची शेवटची तारिख २८ ऑगस्ट २०१९ आहे. अर्ज करण्यासाठी काही अर्ज नियम ठेवण्यात आले आहेत.

यापदासाठी पूर्व परीक्षा प्रशिक्षण कॉल पत्र देण्यात येईल. सप्टेंबर महिन्यात हे पत्र देण्यात आले होती. तर त्यानंतर पूर्व परीक्षा प्रशिक्षण २३ ते २९ सप्टेंबर दरम्यान आयोजित केले जाणार आहे. त्यानंतर ऑक्टोबरच्या सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यात परिक्षेसाठी ओळखपत्र जारी करण्यात येईल. त्यानंतर १२, १३, १९ आणि २० ऑक्टोबर २०१९ या परिक्षा होणार आहेत.

उमेदवाराची वयोमर्यादा ही २० ते ३० वर्षे असणे आवश्यक आहेत. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयासाठी सुट देण्यात आली आहे. तसंच शैक्षणिक पात्रताही ठेवण्यात आली आहे. उमेदवारांकडे शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून कोणत्याही विषयात पदवी असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया पुढील प्रमाणे होणार आहे. उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. प्राथमिक परीक्षेत ६० मिनिटात १०० प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित आहे. ही परिक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त