सैफ अली खानचा मुलगा इब्राहिमचं आजोबा नवाब पटौदींच्या पावलावर ‘पाऊल’, क्रिकेटबाबत अधिकच ‘पॅशनेट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचा मुलगा इब्राहिम अली खान आपले आजोबा मंसूर अली खान यांच्या पाऊलावर पाऊल टाकताना दिसत आहे. आजोबा पटौदींप्रमाणे इब्राहिमदेखील क्रिकेटच्या बाबतीत पॅशनेट आहे. इब्राहिमचा एक नवीन फोटो समोर आला आहे. ज्यात तो क्रिकेटची प्रॅक्टीस करताना दिसत आहे.

ब्लॅक टीशर्ट आणि व्हाईट शॉर्टमध्ये इब्राहिम डॅशिंग दिसत आहे. प्रॅक्टीसमदरम्यान इब्राहिमचे अनेक वेगळे मूड पाहायला मिळाले. इब्राहिमचे हे फोटो चाहत्यांमध्ये खूपच व्हायरल होताना दिसत आहेत.

View this post on Instagram

#tb #ibrahimalikhan #cricket in #mumbai #juhu

A post shared by Ibrahim Ali Khan FC (@iakpataudi_fc) on

इब्राहिमला क्रिकेटची आवडच नाही तर, तर तो क्रिकेटला फॉलो करण्याबाबत खूप पॅशनेट आहे. सैफ आणि अमृता यांच्याकडूनही इब्राहिमला क्रिकेटमध्ये पुढे जाण्यासाठी अनुमती आहे. त्यांनाही हे पाहायचे आहे की, इब्राहिम आपल्या या पॅशनला मोठ्या स्केलवर पढे घेऊन जाण्यास सक्षम आहे किंवा नाही. इब्राहिमचे आजोबा मंसूर अली खान पटौदी भारतीय टीमचे कॅप्टन राहिले आहेत.

इब्राहिम आपल्या आजोबाकडून खूपच प्रेरीत आहे. सूत्रांचं म्हणणं आहे की, करिअर म्हणून इब्राहिम आधी क्रिकेटमध्ये ट्राय करेल. जर तो काही खास करू शकला नाही तर सिनेमात जाईल.

View this post on Instagram

#champ #ibrahimalikhan

A post shared by Ibrahim Ali Khan FC (@iakpataudi_fc) on

इब्राहिम नियमित क्रिकेट प्रॅक्टीससाठी जातो. कधी कधी त्याला सपोर्ट करण्यासाठी सैफही फिल्डवर जात असतो. इब्राहिमचा पूर्ण फोकस सध्या क्रिकेटवर आहे. इब्राहिम आणि बहिण सारा अली खानमध्ये खूप चांगली बाँडिंग आहे. जसा इब्राहिमचा पूर्ण फोकस क्रिकेटवर आहे. तसाच साराचा पूर्ण फोकस आपल्या सिनेमावर आहे.

आरोग्यविषयक वृत्त

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

 

You might also like