Ibrahim Ashq |’कहोना प्यार है’, ‘क्रिश’, ‘वेलकम’ चित्रपटांचे गीतकार इब्राहिम आश्क यांचे ‘कोरोना’मुळे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ऋतिक रोशनच्या (Hrithik Roshan) ‘कहो ना प्यार है’ (Kaho Na Pyaar Hai) या शीर्षक गीताचे गीतकार इब्राहिम आश्क (Ibrahim Ashq) यांचे रविवारी (दि.16) कोरोनामुळे (Corona) मुंबईत निधन (Death) झाले. इब्राहिम आश्क (Ibrahim Ashq) यांची धाकटी मुलगी मुसफा खान (Musafa Khan) हीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास मीरा रोड येथील हॉस्पिटलमध्ये इब्राहिम आश्क यांचे निधन झाले. इब्राहिम आश्क यांनी आपली कारकिर्द पत्रकार म्हणून सुरु केली.

अधिक माहिती देताना मुसफा खान म्हणाल्या, शनिवारी सकाळी बाबांना खूप खोकला होता. तसेच रक्ताच्या उलट्या होत होत्या. त्यामुळे त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona Test Positive) आली. त्यांना आधिच हृदयविकाराचा त्रास होता. त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर (Ventilator) ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांचा रविवारी मृत्यू झाला.

‘कहोना प्यार है’ व्यतिरिक्त 70 वर्षीय इब्राहिम आश्क यांनी ‘कोई मिल गया’, ‘क्रिश’, ‘वेलकम’, ‘ऐतबार’, ‘जानशीन’, ‘ब्लॅक अँड व्हाईट’, ‘आप मुझे अच्छे लगने लगे’, ‘बॉम्बे टू बैंकॉक’ अशा अनेक चित्रपटांसाठी इब्राहिम आश्क (Ibrahim Ashq) यांनी गाणी लिहिली आहेत.

 

Web Title : Ibrahim Ashq | lyricist ibrahim ashq dies of coronavirus

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे हि वाचा

 

Vitamin And Mineral For Health | इम्यूनिटी, हाडे, मेंदू आणि डोळे मजबूत बनवतात व्हिटॅमिन A,B,C,D; ‘हे’ मिनरल सुद्धा आवश्यक, जाणून घ्या

Uric Acid | तुमच्या शरीरात होत असेल ‘ही’ समस्या, तर यूरिक अ‍ॅसिड वाढल्याचा असू शकतो संकेत; जाणून घ्या

Covid-19 vs Influenza | सर्दी-ताप, डोकेदुखीची लक्षणे ‘कोविड’ची आहेत की ‘फ्लू’ची, हे कसे ओळखावे? जाणून घ्या

Aloe Vera Juice Benefits | रोज प्याल एलोवेरा ज्यूस तर शरीराला होतील ‘हे’ 5 फायदे; जाणून घ्या

Maratha Reservation | उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या घरावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धडकणार ‘लाँग मार्च’ (व्हिडिओ)

Mahavikas Aghadi | राष्ट्रवादी-शिवसेनेत वादाची ठिणगी ! आघाडी न करण्याची महापौरांची भूमिका

Vistadome Coach | मध्य रेल्वेवरील ‘व्हिस्टाडोम कोच’ना प्रचंड प्रतिसाद ! गेल्या 3 महिन्यात 20,407 प्रवाशांची नोंद, उत्पन्न रु.2.38 कोटी

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 41 हजारांपेक्षा जास्त रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी