कौतुकास्पद ! पंकज अडवाणीनं 22 व्या वेळी जिंकली जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धा

मंडाले : वृत्तसंस्था – भारताचा अव्वल बिलियर्डस व स्नूकरपटू पंकज अडवाणी याने आपल्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला आहे. थवे ओ याला पराभूत करीत 150 अप पॉइंट पद्धतीच्या जागतिक बिलियर्डसचे विजेतेपद पटकाविले. हे त्याचे 22वे जागतिक विजेतेपद आहे.

पंकज अडवाणी याने थवे ओ याला 6-2 150(145)-4, 151(89)-66, 150(127)-50(50), 7-150(63,62), 151(50)-69(50), 150(150)-0, 133(64)-150(105), 150(74)-75(63) ने पराभूत करून विजेतेपद पटकावले. पंकज याने थवे ओ याला पराभूत करून 22 व्या वेळी जागतिक विजेतपद पटकावले आहे. गेल्या सहा वर्षातील अडवाणीचे हे पाचवे विजेतेपद आहे.

तत्पूर्वी, अडवाणी याने इंग्लंडच्या माइक रसेल याला 5.2 ने हरवून आयबीएसएफ वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. मागील वर्षी देखील याच वेळी त्या दोघांमध्ये लढत झाली होती. त्यामध्ये देखील अडवाणी विजयी झाला होता. थवे ओ याने भारताच्या सौरभ कोठारी याला 5.3 ने पराभूत केले.

You might also like