ICAI CA Result 2021 | सीए परीक्षेचा निकाल जाहीर, देशात नंदिनी अगरवाल पहिली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI CA Result 2021) सीए फाउंडेशन आणि अंतिम परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर (announce) केला. सीएच्या अंतीम परीक्षेत (नवीन अभ्यासक्रमानुसार) (ICAI CA Result 2021) देशात नंदिनी अगरवाल Nandini Agarwal (मोरेना) हिने 76.75 टक्के गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर इंदौर येथील साक्षी एरन हिने 76.63 टक्के गुण मिळवीत दुसरा, तर बंगळूर येथील साक्षी बाग्रेचा हिने 75.63 टक्के गुण मिळवीत तिसरा क्रमांक मिळवला आहे.

आयसीएआय तर्फे जुलै 2021 मध्ये सीए फाउंडेशन (CA Foundation) आणि अंतिम परीक्षा घेण्यात आली. नवीन योजनेनुसार अंतिम परीक्षेतील ग्रुप एकची परीक्षा दिलेले 20.23 टक्के विद्यार्थी, तर ग्रुप दोनची परीक्षा दिलेले 17.36 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सीए फाउंडेशन परीक्षा दिलेले 26.62 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. देशातून 7 हजार 774 विद्यार्थी सनदी लेखापाल (Chartered Accountant) होण्यासाठी पात्र ठरले आहेत.

देशभरातून 71 हजार 967 विद्यार्थ्यांनी फाउंडेशन परीक्षा दिली होती.
त्यातील 19 हजार 158 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यामध्ये 10 हजार 150 विद्यार्थी तर 9 हजार 08 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.

Web Titel :- icai ca result 2021 final and foundation results likely announced nandini agrawal first in india

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Beed Crime | संतापजनक ! पोलीस पतीच्या जाचाला कंटाळून 7 महिन्याच्या गर्भवती महिलेची आत्महत्या

Single Use Plastic Ban | ‘या’ तारखेपासून बॅन होतंय सिंगल यूज प्लास्टिक, जाणून घ्या कोण-कोणत्या वस्तू होतील बंद

Taliban Got Amrullah Salehs Treasure | तालिबानला मिळाला अमरुल्लाह सालेहचा खजिना, जाणून घ्या एकुण किती किंमत?