ICAI Pune | आयसीएआय’ पुणेच्या अध्यक्षपदी सीए काशिनाथ पठारे; उपाध्यक्षपदी सीए राजेश अग्रवाल, सचिवपदी सीए प्रीतेश मुनोत, खजिनदारपदी सीए प्रणव आपटे यांची निवड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ICAI Pune | दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे (ICAI Pune) शाखेच्या अध्यक्षपदी सीए काशिनाथ पठारे (CA Kashinath Pathare) यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी सीए राजेश अग्रवाल (CA Rajesh Agarwal), सचिवपदी सीए प्रीतेश मुनोत (CA Preetesh Munot), खजिनदारपदी सीए प्रणव आपटे (CA Pranab Apte), तर ‘विकासा’ या विद्यार्थी शाखेच्या अध्यक्षपदी सीए मौसमी शहा (CA Mausami Shah) यांची निवड झाली आहे. २०२२ – २०२३ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष सीए काशिनाथ पठारे यांनी मावळते अध्यक्ष सीए समीर लड्डा (Sameer Ladda) यांच्याकडून पदभार स्वीकारला. कार्यकारिणी सदस्य म्हणून सीए ऋषिकेश बडवे (CA Rishikesh Badve), सीए अमृता कुलकर्णी (CA Amrita Kulkarni), सीए सचिन मिणियार (CA Sachin Miniar) , सीए अजिंक्य रणदिवे (CA Ajinkya Ranadive) यांची निवड करण्यात आली आहे. (ICAI Pune)

 

यावेळी केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे (CA Chandrasekhar Chitale), विभागीय समिती सदस्य आणि वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे उपाध्यक्ष सीए यशवंत कासार (CA Yashwant Kasar), सीए ऋता चितळे (CA Rita Chitale) उपस्थित होते. शाखेच्या वतीने तसेच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन केले. सीए समीर लड्डा यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या कामांविषयी तसेच राबविलेल्या योजनांविषयी माहिती दिली. सर्व सहकारी व कर्मचारी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. (ICAI Pune)

आयसीएआय पुणे शाखेची सुरुवात १९६२ मध्ये झाली. आज पुणे शाखेचे १०,००० पेक्षा अधिक सभासद आहेत. तर २२००० पेक्षा जास्त विद्यार्थी पुणे शाखेशी संलग्नित आहेत. बिबवेवाडी येथील आयसीएआय भवन येथे अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असलेल्या संस्थेत सनदी लेखापालांसाठी अनेक उपक्रमांचे आयोजन वर्षभर केले जाते. त्यामध्ये कार्यशाळा, चर्चासत्रे आदी गोष्टींचा समावेश आहे.

 

सीए काशिनाथ पठारे म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून देशातील सर्वात मोठ्या शाखांपैकी एक असलेल्या पुणे शाखेला यशाची मोठी परंपरा आहे.
अनेक पारितोषिके या शाखेने पटकावले आहेत.
यंदा पुणे शाखेचा हीरक महोत्सव साजरा होत असून, मला अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळतेय, याचा आनंद आहे.
भारतातील सर्वात मोठ्या शाखेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर विश्वासाने दिल्याबद्दल सर्व सनदी लेखापाल सदस्यांचा आभारी आहे.
येत्या काळात सीए सभासद व विद्यार्थ्यांसाठी अनेक चांगले उपक्रम राबविणार असून, सीए सामान्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी जागृती उपक्रम घेणार आहे.”

 

Web Title :- ICAI Pune | CA Kashinath Pathare as President of ICAI Pune CA Rajesh Agarwal elected as Vice President CA Preetesh Munot as Secretary CA Pranab Apte as Treasurer

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा