World Cup 2019 मध्ये काॅमेंट्रीसाठी ICC कडून ‘या’ २ मराठमोळ्या ‘कॉमेंटेटर’ची निवड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वर्ल्डकप स्पर्धेची इंग्लंडमध्ये जय्यत तयारी सुरु आहे. समालोचकांमुळे सामन्यात आणखी रंगत येते. या विश्वचषकासाठी आयसीसीने एकूण २४ समालोचकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये विविध देशातील माजी खेळाडूंना तसेच समालोचकांना संधी देण्यात आली आहे. भारताच्या ३ खेळाडूंचा यात समावेश आहे. यात दोन समालोचक हे मराठी आहेत. संजय मांजरेकर, हर्षा भोगले, आणि सौरव गांगुलीचा यात समावेश आहे. यात संजय मांजरेकर आणि हर्षा भोगले हे दोन मराठी समालोचक आहेत.

या स्पर्धेला ३० मे रोजी सुरुवात होणार असून, भारतीय संघ वर्ल्डकपमधील आपला पहिला सामना ५ जून ला खेळणार आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला जाणार आहे. त्यानंतर १६ जून रोजी भारतीय संघ आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान बरोबर सामना खेळणार आहे.

वर्ल्डकपसाठी कॉमेंटेटरची यादी

सौरभ गांगुली, संजय मांजरेकर, हर्षा भोगले, शॉन पॉलक, मायकल स्लेटर, मार्क निकोलस, मायकल होल्डींग, इशा गुहा, पॉमी एमबान्ग्वा, मायकल अथर्टन, अॅलिसन मिचेल, ब्रेंडन मॅकलम, ग्रॅम स्मिथ, वासिम अक्रम, रमीझ राजा, अथर अली खान, इयान वार्ड, सायमन डुल, इयन स्मिथ, नासिर हुसेन, इयन बिशॉप, मेलेनी जोन्स आणि कुमार संगकारा.