Video : पाकिस्तानचे शेपूट ‘वाकड’च ; जाहिरातीत केला अभिनंदन वर्धमानचा वापर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बालाकोट हवाई हल्ल्यातील भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमानची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. भारताबरोबरच पाकिस्तानमध्ये देखील अभिनंदन लोकप्रिय असल्याचे दिसून येत आहे. आयसीसी वर्ल्डकप २०१९ साठी पाकिस्तानमध्ये तयार करण्यात आलेल्या एका जाहिरातीतील मॉडेल देखील अभिनंदन सारख्या स्टाईलमध्ये दिसून येत आहे. १६ जून रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यासाठी हि जाहिरात तयार करण्यात आली असून अभिनंदन सारख्या मिश्या आणि त्याच्यासारखीच बोलण्याची शैली या मॉडेलने पकडली असल्याचे या जाहिरातीत दिसून येत आहे.

अभिनंदनाच्या स्टाईलमध्ये उत्तर

या जाहिरातीतील मॉडेल या सामन्याविषयी बोलताना दिसून येत आहे. यात अभिनंदन ज्या पद्धतीने पाकिस्तानी सैनिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होता, त्याच स्टाईलमध्ये हा मॉडेल देखील बोलताना दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये त्याला रविवारी होणाऱ्या सामन्याविषयी प्रश्न विचारण्यात येत आहेत. या जाहिरातीत त्याला भारत – पाकिस्तान सामना आणि सामन्याच्या रणनीतीबद्दल प्रश्न विचारण्यात येतात. त्यावर हा मॉडेलही चहाचा घोट घेत विंग कमांडर अभिनंदनसारखी उत्तरं देतो. विंग कमांडर अभिनंदनने न घाबरता प्रश्नांची उत्तरं दिली होती. पण या जाहिरातीत मात्र हा मॉडेल घाबरल्याचा अभिनय करतो.
दरम्यान, या संवेदनशील विषयावर पाकिस्तानकडून जाहिरात करत, या विषयाची थट्टा उडवली जात असल्याचे पहायला मिळत आहे. त्याचबरोबर जाहिरातीच्या शेवटी ‘लेट्स ब्रिंग द कप’ अशी या जाहिरातीत म्हटले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

अळूच्या भाजीने तुमचे वजन राहिल नियंत्रणात

ई-फार्मसीसाठी ई-प्रिस्क्रिप्शनची गरज

घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका

स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!