ICC World Cup 2019 : अफगाणिस्तानचा बांगलादेशाला इशारा, ‘हम तो डूबे है सनम, आपको भी लेकर डूबेंगे’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव करत या स्पर्धेत आपली विजयी मालिका कायम राखली आहे. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ च्या पॉईंट्स टेबलमध्ये न्यूझीलंडची टीम ११ पॉईंट्स मिळवत अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर १० पॉईंट्स मिळवत ऑस्ट्रेलिया आहे. टीम इंडिया ९ पॉईंट्नी तिसऱ्या स्थानावर आहे. तर इंग्लड आठ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

या स्पर्धेत भारत ज्याप्रकारे खेळत आहे आणि सध्या भारतीय संघाचा फॉर्म बघता या स्पर्धेत भारतीय संघालाच संभाव्य विजेते म्हणून पहिले जात आहे. कर्णधार विराट कोहली आणि त्याचे शिलेदार या स्पर्धेत या स्पर्धेत उत्तम कामगिरी करत असून भारतीय संघाने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. हि स्पर्धा आता मध्यावर आली असून त्यामुळे गुणतालिकेत सर्वात वर असलेले चार संघच सेमीफायनलमध्ये जाणार असे चित्र सध्या तरी दिसत आहे.

मात्र या सगळ्यात अफगाणिस्तानच्या संघाचे या स्पर्धेतील आव्हान संपले असले तरी, त्यांनी आज होणाऱ्या लढतीत बांगलादेशला वेगळ्याच प्रकारे आव्हान दिले आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार गुलबदीन नैबनं सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत वेगळ्याच अंदाजात बांगलादेशला इशारा दिला आहे. यावेळी त्याने बांगलादेशला इशारा देत म्हटले कि, आमचे आव्हान संपुष्टात आलं आहे. आता तुमचेही आव्हान संपेल असं सांगत त्यांने सामना आम्ही जिंकू असा विश्वास असल्याचं म्हटलं आहे.

यावेळी त्याने हम तो डूबे हैं सनम, तुमको लेकर डुबेंगे या ओळींचा वापर केला.त्यामुळे आता बांगलादेश याला मैदानात काय प्रत्यूत्तर देते हे पाहणे रंजक आहे. या स्पर्धेत अफगाणिस्तानने आतापर्यंत सहा सामने खेळले असून त्यांना एकही सामन्यात विजय मिळवत आलेला नाही. तर बांगलादेशने या स्पर्धेत आतापर्यंत सहापैकी दोन सामने जिंकले तर तीन मध्ये पराभव पत्करावा लागला आहे.

दरम्यान, बांगलादेशला या स्पर्धेत सेमीफायलमध्ये प्रवेश करण्याची संधी असून त्यांचे अजून अफगाणिस्तान, भारत आणि पाकिस्तान यांच्याबरोबर सामने बाकी असून त्यांना सर्व सामन्यांत विजय मिळवणे अनिवार्य आहे. त्यामुळे आता ते या तीन सामन्यांत कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

You might also like