#world-cup-2019 : क्रिकेटपटूंच्या लकी गोष्टी, याशिवाय येत नाहीत मैदानात

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – अनेक जण आपल्या काही लकी वस्तू जवळ बाळगत असतात. त्याचप्रमाणे क्रिकेटर देखील अनेक गोष्टींवर विश्वास ठेवणे असतात. भारताच्या क्रिकेट संघात असे काही खेळाडू आहेत जे मैदानात उतरण्यापूर्वी लकी वस्तू सोबत ठेवायचे. तर नेहमीप्रमाणे विशिष्ट कृती करून सामन्यासाठी तयार होतात.

पाहुयात कोण आहेत हे खेळाडू

१) वीरेंद्र सेहवाग
भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग ‘ हा सुरुवातीला ४४ क्रमांकाची जर्सी वापरायचा मात्र या क्रमांकाने काही फरक पडत नसल्याने त्याने नंतर विना नंबरची जर्सी घालून खेळण्यास सुरुवात केली.

२) सचिन तेंडुलकर

भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला एक विचित्र सवय होती. तो फलंदाजीला येताना डाव्या पायाला पहिल्यांदा पॅड बांधत असे. तसेच आपल्या किट बॅगमध्ये साईबाबांचा फोटोसुद्धा ठेवायचा.

३) विराट कोहली

भारताचा कर्णधार आणि उत्तम फलंदाज विराट कोहली मनगटावर पट्टी बांधून खेळत असे त्यानंतर त्याने हातात कडे घालून खेळण्यास सुरुवात केली आहे. या कड्याला तो लकी मानतो.

४) महेंद्रसिंग धोनी
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा आपला लकी नंबर असलेल्या ७ क्रमांकाची जर्सी घालून खेळतो.

५) युवराज सिंग
भारताचं अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग हा त्याचा वाढदिवस १२ डिसेंबरला असल्याने १२ क्रमांकाची जर्सी घालून खेळतो.
दरम्यान, या गोष्टी श्रद्धा आहेत कि अंधश्रद्धा माहित नाही,परंतु खेळाडू हे सर्व लकी मानतात आणि त्यांच्यासाठी या गोष्टी कामदेखील करतात.