home page top 1

क्रिकेटर हार्दिक पांडयाचा जीव डायमंड मध्ये अडकलाय !

लंडनं : वृत्तसंस्था – आयसीसी वर्ल्डकपमध्ये भारतीय संघांचा डंका कायम आहे. भारत-पाकिस्तान झालेल्या समान्यात मोठ्या प्रमाणात पाहिली गेली. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांना नमवत भारत गुणतालिकेत सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. त्यातनंतर भारतीय संघाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. यात टीम इंडियाचा अष्टपैलु खेळाडू हार्दिक पांड्याची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली. पाकिस्तान विरोधात हार्दिक पांड्यान घेतलेल्या दोन विकेट सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरला होता.पांड्या मैदानासह मेदानाबाहेरही चर्चेत असतो. तसंच तो मुली आणि त्याच्या खेळामुळे अधिक प्रसिद्ध असतो. मात्र पांड्याचा जीव एका वेगळ्याच गोष्टीत अडकल्याचे पांड्याने सांगितलं आहे. बीसीसीआयनं अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्यानं हा खळबळजनक खुलासा केला आहे.

भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल यांनं आपल्या चहल टिव्हीच्या माध्यमातून पांड्याची मुलाखत घेतली.या मुलाखतीत पांड्या म्हणजे चालतं फिरतं डायमंडचं दुकान असल्याचं चहलने सांगितले. चहलने घेतलेल्या मुलाखतीत पांड्यानं डायमंडवर आपला जीव असल्याचे जाहीर केले आहे.पांड्या डायमंडसाठी खूप वेडा आहे. पांड्यांकडे डायमंडची बॅट आणि बॉलही आहे. वर्ल्ड कपसाठी पांड्यानं स्पेशल पेंडन बनवले आहे, ज्यात डायमेंडचा बॅट आणि बॉल आहे. तर, या पेंडनमध्ये चेंडू काळ्या रंगाचा आहे. त्यामुळे तुला नजर लागू नये म्हणून चेंडू काळ्या रंगाचा ठेवला का, असा सवाल चहलनं केला. त्यावर पण पांड्याकडे डायमंडची चेन, अंगठी आणि घड्याळही आहे. एवढा पांड्या डायमंडसाठी वेडा आहे.

दरम्यान, सध्या वर्ल्ड कपमध्ये पांड्या चांगली कामगिरी करताना दिसत आहे. भारतीय संघासाठी खेळणं माझा श्वास आहे, आणि हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे असेही सांगितले. मी असा खेळाडू आहे जो खेळावर प्रचंड प्रेम करतो. मी प्रत्येक सामने चिकाटीने खेळतो. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून वर्ल्ड कपसाठी तयारी करत असून आता ती ” वेळ आली आहे ” असंही त्याने यावेळी म्हटलं.

आरोग्याविषयक वृत्त

ही ” योगासन ” करतील मासिक पाळीतील आजारांवर नियंत्रण

प्राचीन ग्रंथांमध्ये सूखी वैवाहिक जीवनासाठी सेक्ससंबंधी शास्त्रीय माहिती

दुधी भोपळ्याची भाजी खाल्ल्यास दूर पळतील अनेक आजार

डोकेदुखीची वेदना एक…परंतु, कारणे असू शकतात वेगवेगळी

चिंता, दु:ख, मानसिक तणावामुळे वाढतात पोटाचे विकार

कच्ची पपई यकृतासाठी उत्तम, इतरही आहेत अनेक फायदे

सिने जगत

मराठी अभिनेत्री केतकी चितळे प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे निर्देश

…म्हणून सनी देओल ‘१६’ वर्षे शाहरुख खानशी बोलला नाही

Loading...
You might also like