धोनीचे नेतृत्वगुण ; फलंदाजी करताना बनला बांगलादेशचा मार्गदर्शक

इंग्लड : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या विश्वचषकाची धुंद सर्वत्र दिसत आहे. त्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी फंदाजीत आपल्या जुन्या फॉर्ममध्ये आला आहे. त्यामुळे त्याचे चाहतेही सुखावले आहेत. कर्णधार पदापासून निवृत्त झाला तरी त्याला सर्व कॅप्टन कुलच म्हणतात. त्याच्यातीलही कर्णधाराचे नेतृत्वगुण कमी झालेले नाहीत. याची प्रचिती नेहमी येत असते. नुकत्याच झालेल्या बांग्लादेश विरोधात फलंदाजीबद्दल चर्चा होत आहे. त्यासोबतच अजून एका गोष्टीची चर्चा सुरु झाली आहे.

संघात खेळत असताना धोनी अनेकदा मार्गदर्शन करत असतो. विराटलाही नेहमी मार्गदर्शन करताना तो दिसतो. मात्र त्याने विरुद्ध संघाला मार्गदर्शन केले तर काय होईल?. सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात घडला आहे.

बागंलादेशविरुद्धच्या सामन्यात तर क्रिकेटच्या मैदानावर कधीच पाहिलं नसेल अशी गोष्ट घडली. महेंद्रसिंग धोनी मैदानात फलंदाजीला असताना त्याने चक्क बांगलादेशची फिल्डिंग लावली. फलंदाजीवेळी धोनीच्या लक्षात आले की बांगलादेशने चुकीच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा केले आहेत. तेव्हा त्याने गोलंदाजाला क्षेत्ररक्षणात बदल करण्याच्या सूचना दिल्या. विशेष म्हणजे बांगलादेशने धोनीने सांगितल्याप्रमाणे बदलही केला.

सामन्याच्या 39 व्या षटकात धोनी फलंदाजी करताना फिरकीपटू शब्बीर रहमान गोलंदाजी करत होता. तेव्हा रनअप घेणाऱ्या शब्बीरला धोनीने थांबवलं. धोनीने शब्बीपला सांगितलं की, मिड विकेटला असलेला क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला उभा कर . धोनीच्या सल्ल्यानंतर बांगलादेशने त्यांच्या क्षेत्ररक्षणात बदल केला.

दरम्यान, धोनीचा अनुभव आणि त्याच्या खेळाचे भारतातच नाही तर जगातही चाहते आहेत. या घटनेने एक समोर आले की धोनी खरच खिलाडू वृत्तीचा आहे. तर इतर देशाचे खेळाडूही त्याचा खूप आदर करतात हेच दिसून आले.