पाकिस्तानच्या ‘या’ फलंदाजाच्या दोन वर्षांच्या कन्येचं निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचा फलंदाज असिफ अली याच्या दोन वर्षीय मुलीचं निधन झाल्याचे वृत्त समोर येत आहे. यामुळे आसीफ अली याला इंग्लंड दौऱ्यातून मायदेशी परतावे लागले आहे. त्याच्या दोन वर्षांच्या मुलीला कॅन्सरने ग्रासले होते. यातच तिचा मृत्यू झाला. पाकिस्तानच्या अनेक खेळाडूंनी याबद्दल अलीचे सांत्वन केले आहे.

त्याच्या मुलीला चौथ्या स्टेजचा कँसर झाला होता. ज्यावेळी हे वृत्त बाहेर आले त्यावेळी तो इंग्लंडविरुद्ध पाचवा एकदिवसीय सामना खेळत होता. अमेरिकेत त्याच्या मुलीवर उपचार सुरु होते. पाकिस्तान सुपर लीगमध्ये तो खेळत असलेल्या इस्लामाबाद युनायटेडनं हि माहिती दिली आहे. या मालिकेत त्याला काही विशेष कामगिरी करण्यात यश आलेले नाही.

त्याचा समावेश पाकिस्तानच्या विश्वकप संघात नाही, त्यामुळे पाचवा सामना संपल्यानंतर तत्काळ तो अमेरिकेला रवाना झाला आहे.दरम्यान या संदर्भात त्याने आणि इस्लामाबाद युनायटेडनं ट्विट करून माहिती दिली आहे. या मालिकेत पाकिस्तानचा एकतर्फी पराभव झालेला आहे . इंग्लंडने ४-० ने हि मालिका जिंकली आहे.