कॉमेंट्रीमध्ये पदार्पण करताच सचिननं केली ‘ही’ मोठी भविष्यवाणी

लंडन : वृत्तसंस्था – भारताचा महान फलंदाज आणि माजी खेळाडू सचिन तेंडुलकर याने काल विश्वचषकात समालोचक म्हणून पदार्पण केले. यावेळी तो वीरेंद्र सहवाग आणि सौरव गांगुली यांच्यासोबत कॉमेंट्री बॉक्स आणि मैदानावर दिसला. यावेळी त्याने विविध विषयावर गप्पा मारताना जुन्या आठवणींना देखील उजाळा दिला. काळ दक्षिण आफ्रिका आणि यजमान इंग्लंड यांच्या आत खेळवल्या गेलेल्या उदघाटनाची सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या कॉमेंट्री करियरची सुरुवात केली.

या सामन्यात यजमान इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा १०४ धावांनी पराभव केला. यावेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये त्याने सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग आणि हरभजन सिंग यांच्याबरोबर गप्पा मारल्या. यावेळी त्याने मोठी भविष्यवाणी केली. सेमीफायनलमध्ये कोणते चार संघ जाणार असे सचिनला विचारले असता त्याने भारत, न्यूझीलंड, इंग्लंड आणि चौथ्या स्थानावर दक्षिण आफ्रिका असू शकते अशी शक्यता त्याने वर्तवली.

चारही संघ सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असून त्यांच्या संघातील जवळपास प्रत्येकी पाच खेळाडू उत्तम कामगिरी बजावत असल्याने त्यांना यावेळी विश्वकप जिंकण्याची संधी असल्याचे मत त्याने व्यक्त केले. त्याचबरोबर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार असल्याचे देखील त्याने यावेळी म्हटले.