क्रिकेटर इम्रान ताहिरची प्रेमकहाणी ; प्रेमासाठी देशही सोडला

इंग्लंड : वृत्तसंस्था – दक्षिण आफ्रिकेचा सर्वात अनुभवी फिरकीपटू इम्रान ताहिरने आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत भारतातही त्याचा चाहता वर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे त्याच्याविषयी जाणून घेण्यास त्याचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. विश्वचषकातील बांगलादेशविरुद्धचा सामना त्याचा १०० वा एकदिवसीय सामना असणार आहे. त्यामुळे आफ्रिकेकडून अशी कामगिरी करणारा तो २४ वा खेळाडू ठरला आहे.

इम्रान ताहीर हा मुळचा पाकिस्तानचा आहे. तो दक्षिण आफ्रिकेत कसा, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना नेहमी पडतो. तो तिथे आहे ते त्याच्या प्रेमासाठी. क्रिकेटमधील खेळाडूंच्या प्रेमकहाण्या काही नवीन नाही. त्यातल्यात्यात इम्रानची प्रेम काहाणी काही वेगळी आहे. १९९८मध्ये इम्रान ताहिर पाकिस्तानच्या अंडर १९ संघातून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला. त्यावेळी त्याची ओळख दक्षिण आफ्रिकेतील भारतीय वंशांच्या सुमैया दिलदारसोबत झाली आणि पुढे एकमेकांच्या प्रेमात पडले. सुमैयाच्या प्रेमात इम्रानने दक्षिण आफ्रिकेत राहण्याचा निर्णय़ घेतला. आणि २००६ मध्ये दोघे विवाह बद्ध झाले. त्यानंतर त्यांना दक्षिण आफ्रिकेचं नागरिकत्व मिळालं.

त्यानंतर तेथे ताहिरने डॉल्फिन्स आणि टायटसकडून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यानंतर इम्रानला दक्षिण आफ्रिकेकडून खेळण्याची संधी मिळाली. देशांतर्गत सामन्यातील कामगिरीच्या जोरावर २०११ च्या वर्ल्ड कपआधी त्याची निवड भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी करण्यात आली. मात्र तेव्हाही त्याला खेळता आले नाही. त्यानंतर थेट वर्ल्डकपमध्ये ताहिरने त्याच्या फिरकीची जादू दाखवली. वेस्ट इंडिजविरुद्ध ७ विकेट घेत त्याने आपला ठसा उमठवला. त्यानंतर ताहिर यशाची शिखरे सर करत गेला. आतापर्यंत ९९ एकदिवसीय सामन्यात त्याने १६४ विकेट घेतल्या आहेत.

प्रेमासाठी ताहीरने देश सोडला. खेळाच्या जोरावर दुसऱ्या देशातील संघात नाव कमवलं, अशा ताहिरची प्रेमकाहाणी थोडी वेगळी आहे.

दरम्यान, ताहीरेन आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना आपली जादू दाखवली. तो आपल्या फिरकीच्या जोरावर गोलंदाजांना कसे नाचवायचे हे त्याला उत्तम माहित आहे. त्यामुळे त्याचा गोलंदाजीचाही चाहता वर्ग सर्वत्र आहे. यंदा वर्ल्डकपमध्ये ताहीरच्या फिरकीची जादू पाहण्यासाठीही सर्व उत्सुक आहेत.