home page top 1

सामना रद्द झाल्याने महेंद्रसिंग धोनीची मुलगी झिवा चक्‍क रडली

ट्रेंट ब्रीज : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली असून सगळेच संघ जिंकण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत आहे. सगळ्याच संघाचे जवळपास तीन  सामने झाले आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड गुणतालिकेत सध्या सर्वात वरच्या स्थानावर आहे.

https://twitter.com/DHONIism/status/1139151845283192838

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात  भारताने शानदार ३६ धावांनी  विजय मिळवत आपला दुसरा विजय साजरा केला. त्यानंतर काल झालेला  न्यूझीलंडविरुद्धचा  सामना पावसात  वाया गेला. त्यामुळे सलग तिसरा विजय मिळवत गुणतालिकेत वरच्या स्थानावर जाण्याची भारतीय संघाची संधी हुकली. याआधी देखील पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्याचबरोबर सोमवारी झालेला विंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना देखील पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

त्यानंतर  झालेला श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामना देखील रद्द करण्यात आला होता.दरम्यान, कालच्या सामन्यात एक अतिशय मजेशीर गोष्ट पाहायला मिळाली. भारतीय चाहते हा सामना रद्द झाल्याने जितके दुःखी  झालेले पाहायला मिळाले तितकीच दुःखी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग याची लेक झिवा पाहायला मिळाली.

सोशल मीडियावर याविषयीचे तिचे फोटो व्हायरल झाले आहेत. यात ती रडवेला चेहरा केलेली पाहायला मिळत आहे.  ट्रेंट ब्रीजच्या मैदानावर ती सामना रद्द झाल्यानंतर रडताना दिसली. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर फॅन्सनी कमेंट्स केल्या आहेत. काही जणांनी ढिसाळ नियोजनाबद्दल आयसीसीवर टीका केली आहे.

तर काही जणांनी झिवा सारखेच आमचेही हाल असल्याचे मत मांडले. यावर्षीप्रमाणे आधीदेखील १९९२ तसेच २००३ मध्ये सामने रद्द होण्याच्या घटना घडल्या आहेत. प्रत्येक  सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्याची मागणी देखील केली गेली होती, मात्र आर्थिकद्रुष्ट्या हे शक्य नसल्याचे आयसीसीने म्हटले आहे.

सिने जगत – 

कतरिना कैफने करिअरबाबतीत केला ‘हा’ मोठा खुलासा

अर्जुन कपूरच्या शर्टलेस फोटोला पाहून ‘थक्क’ झाली मलायका, म्हणाली……

#Video : ‘बाहुबली ३’ चित्रपटाचे निर्देशन ‘या’ निर्मात्याने केले पाहिजे : तमन्ना भाटिया

#Video : बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमानला वाटते ‘या’ गोष्टीची भीती

Loading...
You might also like