वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत ‘हे’ संघ ठरले आहेत जायंट किलर !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – वर्ल्डकपमध्ये काळ झालेल्या सामन्यात बांगलादेशने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत सर्वांनाच धक्का दिला. मात्र हे काही पहिल्यांदाच घडलेले नाही. याआधी देखील अनेक लहान संघानी मोठ्या आणि बलाढ्य संघाना मात देऊन धक्का दिला आहे. आयसीसी रँकिंगमध्ये सातव्या क्रमांकावर असलेल्या बांगलादेशन तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या साऊथ आफ्रिका संघाचे कंबरडे मोडले. तब्बल सात वेळा मोठ्या संघाना धक्का देण्यात त्यांना यश आले आहे.

पाहूया कोण आहेत हे संघ
१) भारत –
१९८३ च्या विश्वचषकात दुबळ्या समजल्या जाणाऱ्या भारतीय संघाने बलाढ्य विंडीजवर मत करत खळबळजनक विजय मिळवत विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. १८३ धावांवर ऑल आऊट होऊनही शक्तिशाली वेस्ट इंडिज संघाला ४३ धावांनी नमवले. आणि चॅम्पियनचा ताज मिळवला.

२) जिम्बाब्वे – अतिशय दुबळ्या समजल्या जिम्बाब्वे संघाने १९८३ च्या वर्ल्ड कपमध्ये जिम्बाब्वे संघाने ऑस्ट्रेलियाला १३ धावांनी नमवत खळबळ माजवली होती. फलंदाजी करताना जिम्बाब्वेने २३९ धावा केल्या. मात्र ऑस्ट्रेलियाला हे आव्हान पेलवले नाही.

३) केनिया – अतिशय दुबळ्या समजल्या केनिया संघाने १९९६ च्या स्पर्धेत बलाढ्य विंडीजला हरवत खळबळ उडवून दिली होती. १६७ धावांचा पाठलाग करताना त्यांनी वेस्ट इंडिज संघाच्या नाकीनऊ आणले. परिणामी ९३ धावांतच सर्व संघ बाद झाला आणि केनिया संघानं हा सामना जिंकला.

४) केनिया – २००३ च्या वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा केनिया संघाने आपले वर्चस्व दाखवले. यावेळी त्यांनी श्रीलंकेला आपला हिसका दाखवला. केनियाने दिलेल्या २११ धावांचे आव्हान श्रीलंकेला पेलावले नाही, परिणामी केनियाने तब्बल ५३ धावांनी हा सामना जिंकला.
५) आयर्लंड – २००७ मध्ये दुबळ्या आर्यलंडने पाकिस्तानला धूळ चारत या स्पर्धेत नवीन विक्रम केला होता. त्यांनी पाकिस्तानला १३२ धावांत ऑल आऊट करत शानदार विजय मिळवला होता. त्याचप्रमाणे त्यांनी २०११ च्या स्पर्धेत देखील क्रिकेटचे जनक असणाऱ्या इंग्लडचा धक्कादायक पराभव करत त्यांचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आणले होते.

६) बांगलादेश – २००७ च्या वर्ल्ड कपमध्येही बांगलादेश संघाने आपली ताकद दाखवली. राहुल द्रविड पासून सचिनपर्यंत सर्वाना धक्का देणारा विजय त्यांनी मिळवला होता . बांगलादेशने भारतीय संघाला ५ विकेटने नमवत थेट वर्ल्ड कपच्या बाहेर केले होते.